औद्योगिक वसाहतीत प्रशिक्षण केंद्र
उभारण्याचा विचार
-
मुख्यमंत्री
पुणे, दि.
19 : राज्यातील औद्योगिक क्षेत्र गतीने
विस्तारत आहे. या विस्तारणाऱ्या
औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारे
मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी
प्रत्येक औद्योगिक वसाहतीत औद्योगिक
प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा राज्य
शासनाचा विचार आहे, असे
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
आज सांगितले.
मुख्यमंत्री चव्हाण
यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील
मावळ तालुक्यातील
लोणावळा येथे शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेची प्रशासकीय, वसतिगृह इमारत आणि
सेंटर फॉर एक्सलन्सचे उदघाटन
आज झाले. त्यावेळी ते बोलत
होते.
सार्वजनिक
बांधकाम तथा पर्यटनमंत्री छगन
भुजबळ, आमदार संजय भेगडे,
मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया,
प्रधान सचिव मेधा गाडगीळ,
रोजगार आणि स्वंयरोजगार विभागाचे
आयुक्त विजयकुमार गौतम, टाटा
समूहाचे संचालक आर.के.कृष्णकुमार,
ताज हॉटेल्स कंपनीचे व्यवस्थापकीय
संचालक रेमंड बिगसन आदी
उपस्थित होते.
मुख्यमंत्री
चव्हाण म्हणाले, राज्यात अनेक
कंपन्या गुंतवणूकीस प्राधान्य देत
आहेत. त्यामुळे
राज्यातील औद्योगिक क्षेत्र वेगाने
विस्तारत आहे. विस्तारणाऱ्या औद्योगिक
वसाहतीतच औद्योगिक प्रशिक्षण केंद्र
सुरू करण्याचा मानस आहे.
त्यासाठी औद्योगिक कंपन्यांचे सहकार्य
घेण्याचा विचार
आहे. औद्योगिक विकासाबरोबरच विविध
प्रकारची सेवा आणि वित्तीय
त्याचबरोबर त्याअनुषांगिक क्षेत्रात
रोजगाराची संधी निर्माण होत
आहेत. या संधींचा ग्रामीण
भागातील तरूणांना लाभ मिळायचा
असेल तर विविध प्रकारची
कौशल्ये त्यांना द्यायला हवीत.
त्यासाठी सेंटर फॉर एक्सलन्स
अतिशय उपयुक्त ठरू शकतील.
आपल्या
लोकसंख्येत तरूणांईची संख्या मोठी
आहे. पण त्यापैकी फारच
थोड्याजणांकडे विविध प्रकारचे कौशल्य
आहे. केंद्र सरकारने देशातील
50 कोटी
युवकांना विविध कौशल्ये देण्याची
योजना आखली आहे. या योजनेच्या
अखेर देशात मोठ्या प्रमाणावर
कुशल मनुष्यबळ विकसित होईल,
असेही मुख्यमंत्री चव्हाण
यांनी सांगितले.
सार्वजनिक
बांधकाम मंत्री छगन भुजबळ
म्हणाले, आर्थिक उदारीकरणानंतर देशात
मोठे फेरबदल झाले आहेत.
यामुळे रोजगाराची अनेक क्षेत्रे
खुली झाली. मात्र त्यासाठी कोणतेतरी कौशल्य असण्याची
गरज आहे. त्यामुळे कौशल्य
विकास करणाऱ्या संस्थांची आवश्यकता
आहे.
यावेळी
मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया,
आर.के.कृष्णकुमार, रेमंड
बिगसन यांचीही भाषणे झाली.
विजयकुमार गौतम यांनी प्रास्ताविक
तर संस्थेचे प्राचार्य के.डी.
शिंदे यांनी आभार मानले.
राज्य
शासन आणि ताज हॉटेल
रिसॉर्टस अँड पॅलेसेस यांच्या
सहकार्यातून सेंटर फॉर एक्सलन्स
इन स्किल ट्रेनिंग उभारण्यात
आले आहे. या सेंटरमधून
सध्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी
लागणाऱ्या मनुष्यबळाचा विकास
केला जाणार आहे. त्यासाठी
आवश्यक असणारे सर्व प्रकारचे
प्रशिक्षण देण्यासाठी टाटा समूहाने
पुढाकार घेतला आहे.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा