गुरुवार, ११ एप्रिल, २०१३

सामाजिक जाणीवेची गुढी उभारण्याचे
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई, दि. 10 : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा संदेशात श्री. चव्हाण म्हणतात की, मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडव्याचा सण आपण साजरा करतो. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणून या सणाला विशेष असे महत्व आहे. गुढी ही आनंद आणि विजयाचे प्रतिक आहे.
गुढीपाडव्याचा आनंदोत्सव साजरा करतांना राज्याचा काही भागात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत तेथील बांधवांना सामाजिक जाणिवेतून कशी जास्तीत जास्त मदत करता येईल याचा विचार देखील आपण करुन या नववर्षात एक आदर्श पाऊल आपण उचलूया असे ही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.
     0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा