शनिवार, ९ मार्च, २०१३

Other news follows..........now uploading only photos.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे
कोल्हापूर विमानतळावर उत्स्फूर्त स्वागत

कोल्हापूर दि. 9 : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आज सकाळी 9-55 वाजता कोल्हापूर येथील विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांचेही आगमन झाले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विमानतळावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील, महापौर जयश्री सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मंडलिक,  खासदार जयवंतराव आवळे, आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भरमू आण्णा पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील,  मालोजीराजे छत्रपती, संजय घाटगे आदी मान्यवरांनी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वागत केले.
यावेळी  जिल्हाधिकारी राजाराम माने, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव  तसेच वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.


                            
        विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा वाढवावी
                                                         -- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

        कोल्हापूर दि. 9 : उत्तम कामगिरीच्या आधारे वैद्यकीय क्षेत्राला विद्‌यार्थ्यांनी नव्या उंचीवर नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहावे. या व्यवसायाची प्रतिष्ठा वाढवावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
        डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूरचा पहिला दीक्षांत समारंभ डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, कदमवाडी, कोल्हापूर येथे झाला, यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. विजय भटकर होते. यावेळी त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, सहकार मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, डॉ. बी. के. गोयल,  अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे, डी. वाय. पाटील विद्यापीठ  ट्रस्टचे अध्यक्ष संजय पाटील, कुलगुरु  डॉ.  एस.  एच. पवार, कुलपती डॉ.  विश्वनाथ भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बी. के. गोयल यांना आरोग्य सेवेमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते तर कोल्हापूरचे भूमीपुत्र शिवराम भोजे यांना अणुशास्त्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते डॉ. ऑफ सायन्स (डी.एस्सी.) ही सन्मान दर्शक पदवी प्रदान करण्यात आली.
        राज्यात दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यासाठी राजमाता जिजाऊ सदृढ माता-बालक अभियान, राजीव गांधी जीवनदायी योजना, जीवन अमृत योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा योजना व्यापक प्रमाणात राबविल्या जात असल्याचेही मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक म्ब्युलन्स उपलब्ध करुन घेऊन त्याद्वारे गंभीर रुग्णांना तातडीने पूर्णत: मोफत उपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. विकासाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असे सांगितले.
महाराष्ट्र सध्या दुष्काळी स्थितीचा सामना करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री चव्हाण यांनी पिण्याच्या पाण्याबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई हा गंभीर प्रश्न असून याबाबत पाण्याचा प्रथम स्त्रोत आटल्यास द्वितीय तृतीय पर्यायी स्त्रोत आराखडा तयार करण्याच्या सूचना नगरपालिका, तहसिल जिल्हा प्रशासनास दिल्याचे सांगितले. मागेल त्याला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून काम जनावरांसाठी चारा छावण्या उपलब्ध करुन दिल्या जात असल्याचे सांगून दुष्काळ निवारणासाठी मोठ्या संस्था उद्योगांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी दुष्काळ निवारणार्थ डी. वाय. पाटील ट्रस्ट तर्फे 21 लाखाचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्याकडे देण्यात आला.
        कोल्हापूर बद्दल बोलताना ते म्हणाले, राजर्षि शाहू महाराजांच्या स्मारकासाठी शाहू मिलचा 27 एकर परिसर उपलब्ध करुन दिला आहे. त्यासाठी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन हरकती सूचना मागविणे सुरु आहे.  या ठिकाणी राजर्षि शाहूंचे कार्य चिरकाल स्मरणात राहील, असे जिवंत स्मारक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
        डॉ.  डी.  वाय. पाटील यांनी मानवसेवा हिच ईश्वर सेवा आहे. चांगल्या विचारांची कास धरल्यास कृतीही चांगल्याच घडतील असे सांगून विद्यार्थ्यांनी आरोग्य सेवेत भरीव योगदान द्यावे,  अशी अपेक्षा व्यक्त केली. कोल्हापूरवासियांनी आपल्यावर केलेल्या अलोट प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 
        कुलपती डॉ. भटकर यांनी भारताला नालंदा, तक्षशीला सारख्या विद्यापीठांचा वारसा आहे. त्याला पुन्हा उजाळा देण्याचे काम भारतातील विद्यापीठांनी करावे, असे सांगून डी. वाय. पाटील विद्यापीठातून वैद्यक क्षेत्रातील सूक्ष्म संशोधनासाठी विविध क्षेत्रे उपलब्ध करुन दिली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
       
                                               00000  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा