डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी शासन कटिबध्द-
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर दि. 9 :समाजातील उपेक्षित
घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून
अनेक कल्याणकारी योजना राबविल्या
जातात. या योजनांना अधिक
गती देण्यासाठी सामाजिक न्याय
विभागाला भरीव निधी देण्यात
येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कोल्हापूर
येथे सुमारे साडेपाच कोटी
रुपये खर्च करुन उभारण्यात
आलेल्या सामाजिक
न्याय भवनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी
सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव
मोघे, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगार व विशेष
सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, गृह
राज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित
होते.
मुख्यमंत्री
म्हणाले, लोकसंख्येच्या प्रमाणात अंदाजपत्रकात निधीची
तरतूद करणारे महाराष्ट्र देशातील
पहिले राज्य आहे. डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी शासन कटिबध्द्द आहे. सामाजिक
न्याय विभागांतर्गत येणारी
सर्व कार्यालये एकाच ठिकाणी
आणण्यासाठी सामाजिक न्याय भवनाची
निर्मिती झाली आहे. राज्यात
20 ठिकाणी
सामाजिक न्याय भवनाचे काम
पुर्ण झाले असून उर्वरित
ठिकाणी कामे प्रगतीपथावर आहेत.
या भवनामुळे उपेक्षितांना दिलासा
मिळणार असून, तरुणांच्या जीवनाला
नवी दिशा मिळेल. या इमारतीतील
आवश्यक सोयी सुविधा ई-टेंडरींगच्या माध्यमातून पूर्ण करण्याच्या सूचना
त्यांनी संबंधितांना दिल्या.
मुख्यमंत्री
म्हणाले, इंदू मिलच्या जागेवर जगाला
प्रेरणा देणारे डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांचे स्मारक तसेच शाहू
मिलच्या जागेवर राजर्षी शाहू
महाराजाचे भव्य स्मारक उभारण्याचा
निर्णय घेतला आहे. रमाई
आवास योजना, ई-स्कॉलरशिप, परदेशी शिष्यवृत्ती,
निवासी शाळा, औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, वसतीगृहे अशा अनेक योजनांची
प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.
या सर्व योजनांचा लाभ
घेऊन प्रगती साधण्याचे आवाहन
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
सामाजिक
न्याय मंत्री शिवाजीराव मोघे
म्हणाले, सामाजिक न्याय भवनाच्या निर्मितीमुळे
सामान्य माणसाला दिलासा मिळाला
आहे. उपेक्षित घटकांना मुख्य
प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय
विभागाच्या अनेक कल्याणकारी योजना
आहेत. या योजनांचा जास्तीत
जास्त लाभ घेण्याचे आवाहन
त्यांनी केले.तसेच व्यसनमुक्ती धोरणाची
प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज
असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री
हर्षवर्धन पाटील म्हणाले, सामाजिक न्याय
भवनामुळे जिल्ह्याच्या वैभवात
भर पडली आहे. शैक्षणिक, औद्योगिक, कृषी, जलसिंचन, वसतीगृह
उभारणी अशा अनेक क्षेत्रात
जगाला आदर्श घालून देणाऱ्या
राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत
हे भवन झाले याचा
आनंद आहे.
कामगार मंत्री हसन मुश्रीफ
म्हणाले, समतेचे तिर्थक्षेत्र म्हणून
कोल्हापूरची ओळख आहे. या शहरात
सामाजिक न्यायभवन उभारले, याचा विशेष
आनंद आहे. सर्व समाजातील
उपेक्षितांनी याचा लाभ घ्यावा.
गृहराज्य
मंत्री सतेज पाटील म्हणाले, सामाजिक
न्याय भवनामुळे सामान्य माणसाला
दिलासा मिळाला आहे. एकाच
इमारतीत सर्व कार्यालये आणणे
या आदर्श कल्पनेमुळे या भवनाची
निर्मिती झाली आहे. याचा
सर्वांनी लाभ घ्यावा.
यावेळी
खासदार जयंतराव आवळे यांनी
मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक
सामाजिक न्याय विभागाचे सचिव
आर. डी. शिंदे यांनी
केले. समाजकल्याण आयुक्त आर.
के. गायकवाड यांनी मान्यवरांचे
स्वागत केले.
यावेळी
महापौर जयश्री सोनवणे, आमदार सुजित
मिणचेकर, जिल्हाधिकारी राजाराम माने, माजी मंत्री
प्रकाश आवाडे, माजी आमदार
पी. एन. पाटील, मालोजीराजे छत्रपती, संजय
घाटगे, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ
अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा