तिसऱ्या महिला
धोरणाचा
कच्चा मसुदा
जाहीर - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 8 : आंतरराष्ट्रीय
महिला दिनाचे औचित्य साधून आज मुंबई पोलीस दलाच्यावतीने महिला सुरक्षा आणि सन्मान
अभियान या कार्यक्रमाचे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजन करण्यात आले. यावेळी तिसऱ्या
महिला धोरणाचा कच्चा मसुदा आज पुणे येथे जाहीर करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे सांगितले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य
न्यायमुर्ती मोहित शाह, गृहमंत्री आर.आर.पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, गृह
राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार हेमा मालिनी, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, मुंबईचे
पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग, अभिनेत्री दिया मिर्झा, प्रिती झिंटा, गायिका
सोनाली राठोड, अभिनेता अनू कपूर, रेमंडचे व्यवस्थाकीय संचालक गौतम सिंघानिया,
पोलीस दलातील अधिकारी आणि मुंबईतील वेगवेगळ्या भागातील महिला मोठ्या संख्येने
उपस्थित होत्या.
महाराष्ट्र हे महिलांसाठी सुरक्षित राज्य
आहे हा संदेश आजच्या या महिला मेळाव्याच्या दिवशी राज्यातील जनतेपर्यंत गेला
पाहिजे. महिलांचे राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक सबलीकरण होत असले तरी सामाजिक
मानसिकतेचे सबलीकरण झालेले नाही. सामाजिक मानसिकता बदलण्याचा शासन सर्वतोपरी
प्रयत्न करेल. महिलांच्या पाठीशी शासन खंबिरपणे उभे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितले.
यावेळी
दुष्काळग्रस्तांसाठी मुंबई पोलीस दलामार्फत दोन कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे
सुपूर्द करण्यात आला. आंतरराष्ट्रीय टेनिसपटू ऋतुजा भोसले हिचा सत्कार यावेळी
करण्यात करण्यात येऊन महिलांच्या सुरक्षिततेच्या मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशनही
यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी मुख्य न्यायमुर्ती मोहित शाह,
गृहमंत्री आर.आर.पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचीही भाषणे झालीत.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा