राज्याच्या नव्या महिला धोरणाचा कच्चा मसुदा खुला
स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्यांवर
सक्त कारवाई- मुख्यमंत्री
पुणे, दि. 8 – आंतरराष्ट्रीय
महिला दिनाचे औचित्य साधून
आज महाराष्ट्र राज्य शासनाच्या
वतीने नव्या महिला धोरणाचा
कच्चा मसुदा आज येथे
जाहिर करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी या धोरणाचा
मसुदा असलेल्या संकेतस्थळाचे
(www.maharashtra.womenspolicy.com) आज येथे अनावरण
केले. यावेळी महिलांच्या विरोधातील हिंसा
आणि स्त्रीभ्रूण हत्यासारख्या
गुन्हा करणाऱ्यांवर सक्त
कारवाई केली जाईल, असे श्री. चव्हाण
यांनी सांगितले.
येथील
शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या
या कार्यक्रमात विविध
क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या
महिलांचा मुख्यमंत्री चव्हाण
यांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री
अजित पवार, सहकार मंत्री
हर्षवर्धन पाटील, महिला आणि
बाल विकास मंत्री प्रा. वर्षा
गायकवाड, राज्यमंत्री फौजिया खान आणि
लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महिला व बालविकास
विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते.
मुख्यमंत्री म्हणाले, समाजातील
सर्व स्तरातील महिलांच्या समस्यांचा
या धोरणात विचार करण्यात
आला आहे. लोकांच्या धोरणाबाबतच्या
मते आणि हरकती विचारात
घेऊन त्यास अंतिम स्वरूप
देण्यात येईल. या धोरणाच्या
मसुद्यावर आधिकाधिक घटकांनी आपली
मते द्यावीत त्याचा अंतिम
धोरण तयार करताना विचार
केला जाईल.
महिलांची
गाऱ्हाणी ऐकण्यासाठी स्वतंत्र महिला
लोकशाही दिन घेण्याचाही निर्णय
राज्य शासनाने घेतल्याचे त्यांनी
सांगितले. या लोकशाही दिनात महिलांच्या
तक्रारी ऐकण्यासाठी महिला अधिकारी
पदाधिकारी उपस्थित राहतील. महिला व बालविकास
विभागाचे पुण्यात आयुक्तालय कार्यालय
आणि महिलांच्या विरोधातील अन्याय
आणि खटल्यांचा तातडीने निकाल
लागावा, यासाठी राज्याच्या काही भागात
जलदगती न्यायालय स्थापन करण्यात
येतील. अंगणवाडी सेविकांना निवृत्तीवेतन देण्याबाबतचा
विचार करण्यात येईल, असेही त्यांनी
सांगितले.
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी नव्या
युगातील समस्या आणि आव्हाने
याचा नव्या महिला धोरणात
विचार केला गेला आहे. कारण
यापुर्वी 1994 आणि 2003 मध्ये यापुर्वी महिला
धोरण जाहिर करण्यात आले
होते. पण आता नव्या परिस्थितीचा
विचार करता नवे महिला
धोरण आवश्यक होते. या धोरणावर व्यापक
चर्चा व्हायला हवी. स्वच्छतागृहे पुरवणे, महिलांच्या
विरोधातील गुन्हेगारांना जरब
बसविण्यासाठी कायदे कडक झाले
पाहिजेत. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.
यावेळी
सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, महिला
व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री
फौजिया खान यांचीही भाषणे
झाली. यावेळी महापौर वैशाली बनकर, आमदार
माधुरी मिसाळ, नीलम गोऱ्हे, दिप्ती
चवधरी, विद्या चव्हाण, आमदार सर्वश्री
रमेश बागवे, बापू पठारे, मोहन
जोशी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक
विभागाचे सचिव उज्वल उके
यांनी तर आभार आयुक्त
राजेंद्र चव्हाण यांनी केले.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा