जाहिरातीमध्ये मुद्रणदोष
‘वर्षा’ व ‘देवगिरी’ येथील खानपानसेवेच्या
निविदेची रक्कम शंभर कोटी नसून एक कोटी
मुंबई, दि. 15 : मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’ शासकीय
निवासस्थान व उपमुख्यमंत्र्यांचे ‘देवगिरी’ शासकीय निवासस्थान येथील खानपानसेवेच्या
निविदेची रक्कम शंभर कोटी रुपये नसुन एक कोटी रुपये आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात
मुद्रणदोषामुळे 1.00 कोटी याऐवजी 100 कोटी असे प्रसिद्ध झाले आहे. अन्य मराठी
दैनिकांमध्ये 1 कोटी हाच आकडा प्रसिद्ध झाला आहे, असा खुलासा मुख्यमंत्री
सचिवालयाने केला आहे.
‘वर्षा’ व ‘देवगिरी’ येथे 1
एप्रिल 2013 ते 31 मार्च 2014 या कालावधीत वेळोवेळी खाद्यपदार्थ पुरविण्याचे
कंत्राट देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने परवानाधारक खाद्यपुरवठादारांकडुन
ई-निविदा प्रणाली द्वारे बाब दर निविदा मागविल्या होत्या. याबाबतची संक्षिप्त
जाहिरात काही मराठी व इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीत एक
कोटी हाच आकडा प्रसिद्ध झाला आहे. या जाहिरातीला प्रतिसाद न मिळाल्यामुळे निविदेला
प्रथम मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला. मुदतवाढीची जाहिरात मराठी व इंग्रजी दैनिकात
दि. 12, 13 व 14 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र ‘मिड डे’ या इंग्रजी
दैनिकात मुदतवाढीच्या जाहिरातीत मुद्रणदोषामुळे 1.00 कोटी ऐवजी 100 कोटी असा
चुकीचा आकडा प्रसिद्ध झाला आहे. याचे दैनिकाने मूळ जाहिरातीमध्ये एक कोटी ही रक्कम
बरोबर प्रसिद्ध केली होती, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा