चि. कनिष्क राजू डोंगरे या आठ वर्षीय विद्यार्थ्याने स्वत:चा वाढदिवस साजरा न करता त्यासाठी येणारा खर्च आणि आपली बचत अशी मिळुन पाच हजार रुपयांची रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी देवू केली. रूपये पाच हजार रकमेचा धनादेश त्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आज सुपूर्द केला.त्या प्रसंगीचे छायाचित्र. यावेळी त्याची आई, तसेच त्याचे वडिल (माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील छायाचित्रकार) राजू डोंगरे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी चि. कनिष्क याचे त्याच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले. चि. कनिष्क हा बदलापूर येथील कार्मेल शाळेतील दुसरीचा विद्यार्थी असहे. यासाठी तो खास बदलापूरहून विधानभवनात आपल्या आईसमवेत आला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा