पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक रंगांच्या विक्री स्टॉलचे उद्घाटन पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. यावेळी पर्यावरण सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, पर्यावरण संचालक बी.एन.पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे आदी.
प्रदुषणविरहीत व सुकी होळी साजरी
करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई, दि. 18 : वसंतोत्सवामधील प्रमुख सण असलेला होळी हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. याचे रुप असेच राहण्यासाठी यावर्षी रंगपंचमीलाघातक रासायनिग रंगांचा वापर, प्लॅस्टीकचे पाण्याचे फुगे व पाण्याचा वापर टाळुन प्रदूषणविरहीत आणि सुकी होळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
राज्य शासनाचा पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पर्यावरणपूरक होळीकरीता जनजागृतीपर उपक्रम राबवून पर्यावरणस्नेही होळी साजरीकरण्याचे आवाहनकरण्यात आले आहे.
होळी उत्सव संपूर्ण राज्यात उत्साहाने साजरा केला जातो. होळी नंतरचा दुसरा दिवसहा धुळवड किंवा रंगपंचमी म्हणून साजरा केला जातो. यावेळी विशेषत: मोठ्या शहरात होणारा घातक रासायनिग रंगांचा वापर, प्लॅस्टीकचे पाण्याचे फुगे तर पाण्याचा अमर्यादवापर रोखण्यासाठी पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने हीजनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
मुख्यमंत्री लिहिणार पत्र
पर्यावरणपूरक होळीच्या निमित्ताने शासनाच्यावतीने राज्यातील मा. आमदार,खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, महापौर, महानगरपालिका तसेच शाळा,प्राध्यापक, विविध शासकीय कार्यालये, न्यायालये, वर्तमानपत्रे, दूरचित्रवृत्तवाहिन्यांचेसंपादक, आर्थिक क्षेत्रातील महत्वाच्या आस्थापना यांना मा. मुख्यमंत्री पत्र लिहून,त्यासोबत मुंबईतील नैसर्गिक रंग भेट म्हणून पाठवून पर्यावरणस्नेही होळी साजरी करण्याचेआवाहन करणार आहेत.
या निमित्ताने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवारराज्यभरातील एक कोटी मोबाईलधारकांशी व्हॉईस कॉलच्या माध्यमातून थेट संवाद साधूनरंगपंचमीला रासायनिक रंगांचा वापर करु नका, राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षातघेता पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे, त्याचा अवास्तव वापर करु नका, यावेळीनैसर्गिक रंगांची सुकी होळी खेळा, असे आवाहन करणार आहेत.
मंत्रालयात नैसर्गिक रंगांची विक्री
याचबरोबर पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यावतीनेमंत्रालयात दिनांक 21 व 22 मार्च 2013 रोजी नैसर्गिक रंगांच्या विक्रीचा स्टॉल उभारलाजाणार आहे.
यावेळी राज्यभरातील प्रमुख दूरचित्रवाहिन्यांवरुन मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा.पर्यावरणमंत्री व मा. पर्यावरण राज्यमंत्री जनतेशी प्रदूषणमुक्त होळीचा संदेश देऊन संवादसाधणार आहेत. त्याचबरोबर राज्यातील सर्व रेडीओ वाहिन्यांवरुन पर्यावरणस्नेही होळीचेआवाहन केले जाणार आहे. राज्यातील दोनशे पाच डिजीटल सिनेमा थिएटर्समधून हा संदेशप्रसारित केला जात आहे. त्याचबरोबर मुंबई शहरातील एक हजार बेस्ट बसेसमधील दोनहजार दूरचित्रवाणी संचावर, मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मध्य, पश्चिम व हार्बरलोकल ट्रेनमधून चारशे दूरचित्रवाणी संचावर हा संदेश प्रसिध्द केला जाणार आहे.
अंध विद्यार्थी देणार शपथ
याबरोबर एका खाजगी वृत्तवाहिनीच्या सहकार्याने कमला मेहता अंधशाळा, दादर येथेपर्यावरणस्नेही होळी दिनांक 25 मार्च 2013 रोजी साजरी केली जाणार आहे. यावेळी अंधविद्यार्थी पर्यावरणपूरक उत्सव साजरे करावेत, अशी शपथ सर्वांना देणार आहेत. या विविधजनजागृतीपर व्यापक उपक्रमांचे आयोजन पर्यावरण सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह यांच्यासंकल्पनेतून व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांच्या संयोजनातून केले जाणारआहे.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा