मुख्यमंत्री सहाय्यता निधी
(दुष्काळ) साठी
देणगीदारांना आता थेट बँकेत
धनादेश जमा करता येतील
मुंबई, दि.26 मार्च :
मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ) या निधीस मदत करु इच्छिणाऱ्यांना अडचण येऊ
नये म्हणून देणगीदारांना थेट बँकेमध्ये किंवा संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयात
धनादेश जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ज्यांना मुख्यमंत्री
सहाय्यता निधी (दुष्काळ) या निधीसाठी मदत करावयची आहे त्यांनी संबंधीत विभागीय
आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात उपायुक्त महसूल किंवा निवासी
उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मदतीचे धनादेश अथवा बँक ड्राफ्ट द्यावेत. हे धनादेश
मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ 2013)/Chief Minister Relief Fund (Drought 2013) स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट शाखा खाते क्र. S.B.32860305777 या नावे द्यावे. हा धनादेश स्विकारल्यानंतर देणगीदारास मुख्यमंत्री सहाय्यता
निधीच्या नावाने कच्ची पावती मिळेल. अशारितीने सर्व धनादेश किंवा ड्राफ्टची यादी
करुन विशेष दूतामार्फत प्रत्येक आठवडयाच्या सुरुवातीला लेखाधिकारी, मुख्यमंत्री
सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे सुपूर्द
करण्यात येतील.
बँकेत थेट भरणा
देणगीदार
थेट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत स्वत: आपला धनादेश किंवा ड्राफ्ट जमा
करु शकतात. हे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता
निधी (दुष्काळ 2013)/Chief Minister Relief Fund
(Drought 2013) स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट शाखा खाते क्र. S.B.32860305777 या खात्यात जमा करावेत. ही रक्कम जमा केल्यानंतर देणगीदारांनी पत्राद्वारे
लेखाधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय,
मुंबई-32 यांना बँकेच्या पावतीच्या प्रतिसह कळवावे, ज्यायोगे त्यांना पावती
पाठविणे सोपे जाईल.
अधिक
माहितीसाठी इच्छुकांनी लेखाधिकारी, मुख्यमंत्री निधी कक्ष यांच्याशी दूरध्वनी
क्रमांक 022-22793759
किंवा 022-22026948 अथवा श्रीमती पाटणकर, लेखाधिकारी यांच्याशी 9833428046 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे मदत व
पुनर्वसन विभागाने कळविले आहे.
ही
सर्व माहिती विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातील सूचना फलकावर
लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा