शनिवार, १६ मार्च, २०१३

राज्यातील विमानतळांच्या प्रश्नांबाबत
केंद्राने त्वरित निर्णय घ्यावेत -- मुख्यमंत्री
        मुंबई, दि. 16 : राज्यातील विविध विमानतळांच्या विस्तारासंदर्भात केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावेत जेणेकरुन राज्याच्या पर्यटन, उद्योग आदी क्षेत्रांच्या विकासाला गती मिळेल, असे आग्रहाचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अजित सिंग यांच्याकडे केले.
          केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अजित सिंग यांनी आज राज्यातील विमानतळांच्या कामांचा सविस्तर आढावा सह्याद्री अतिथीगृह येथे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, केंद्रीय नागरी उड्डाण सचिव श्री. श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव अजितकुमार जैन, प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव (विमानचालन) पी.एस.मीना, एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस. मदान, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, ठाणे महानगरपालिका आयुक्त आर. ए. राजीव आदी उपस्थित होते.
          मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मिहान, औरंगाबाद, पुणे, शिर्डी, नाशिक, कोल्हापूर, कऱ्हाड आणि सिंधुदुर्ग आदी विमानतळांच्या कामांच्या प्रगतीबाबत अजित सिंग यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. तसेच केंद्र सरकार याबाबत आवश्यक ते सहकार्य देईल, अशी ग्वाही दिली. मुंबईतील जुहू विमानतळाच्या विस्ताराबाबत नागरी उड्डाण विभाग सकारात्मक निर्णय घेईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा