गुरुवार, १४ मार्च, २०१३

वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
फ्लेक्स, बॅनर्स न लावता दुष्काळग्रस्तांना
मदत करण्याचे हितचिंतकांना आवाहन
मुंबई, दि. 14 : राज्यातील दुष्काळाची गंभीर समस्या लक्षात घेऊन यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. श्री. चव्हाण आपल्या वाढदिवशी, दि. 17 मार्च रोजी मुंबईमध्ये उपलब्ध नसतील. वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे फ्लेक्स, बॅनर्स, पुष्पहार व गुच्छ यावर खर्च न करता ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
        याबाबत आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की, यावर्षी राज्यात सलग दुसऱ्या वर्षी भीषण दुष्काळाचे संकट आले आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची  टंचाई आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट झाला आहे. दुष्काळावर शासन पुरेशा उपाययोजना करीत असले तरी हे संकट नैसर्गिक असल्याने त्याला मर्यादा आहे. राज्यातील ही परिस्थिती लक्षात घेता वाढदिवसासारखा समारंभ करणे औचित्याला धरुन होणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला असुन हितचिंतकांनी आपला निधी 'मुख्यमंत्री सहायता निधी (दुष्काळ)' या मदत निधीमध्ये द्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच, यादिवशी राज्यात कोठेही समारंभाचे आयोजन न करता दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी पाणी, जनावरांना चारा पुरविण्यासारखे उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले आहे.
00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा