श्री. राहुल गांधी यांची काँग्रेसच्या उपाध्यक्ष
पदावरील
निवड सर्वांनाच प्रेरणादायी : मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण -
जयपूर
(राजस्थान), दि. 19 : अखिल भारतीय काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी झालेली श्री. राहुल गांधी
यांची नियुक्ती ही युवक कार्यकर्त्यांसह सर्वांनाच प्रेरणादायी आहे. 2014 साली होणाऱ्या
निवडणुकांमध्ये निर्विवाद यश मिळविण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती स्वागतार्ह आहे, अशी
प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. या निवडीबद्दल त्यांनी
श्री. राहुलजींचे अभिनंदन केले आहे.
श्री.
चव्हाण यांनी म्हटले आहे की, या निवडीमुळे पक्षाच्या सर्व स्तरांवरील कार्यकर्त्यांमध्ये
उत्साहाचे वातावरण पसरले आहे. भारताची जगातील
ओळख ‘तरुणांचा तरुण देश’ अशी आहे. श्री. राहुलजी यांनी संपूर्ण देशभरात त्यांच्या संयत
आणि प्रभावी नेतृत्वामुळे स्वत:ची उत्कृष्ट प्रतिमा निर्माण केली आहे. माजी पंतप्रधान
दिवंगत राजीवजी गांधी यांच्या कर्तृत्वाची आणि विचारांची परंपरा त्याच जोमाने पुढे
नेण्याची त्यांची क्षमता आहे. पक्षाध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली
त्यांनी देशासमोरील, विशेषत: ग्रामीण भागातील समस्यांचा खुप सखोल अभ्यास केला आहे.
देशातील सर्वात प्रभावी आणि प्रसिद्ध घराण्यात जन्म घेऊनही त्यांची साधी राहणी, प्रसिद्धीपासून
दूर राहण्याची आणि शांतपणे काम करीत राहण्याची पद्धती पक्षातील युवा कार्यकर्त्यांना
विशेष भावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशात आणि महाराष्ट्रात आपला
जनाधार अधिक भक्कम करील, अशी खात्री श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा