‘एमटीएचएल’ साठी केंद्राकडुन तफावत निधी मंजूर
केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम् यांचे
मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
मुंबई, दि. 18 : राज्य सरकारच्या अत्यंत
महत्वाकांक्षी अशा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाला केंद्रीय वित्त
मंत्रालयाने 1920 कोटी रुपये इतका व्यवहार्यता तफावत निधी (व्हिजीएफ) मंजुर केल्याबद्दल
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम् यांचे अभिनंदन
केले आहे.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हटले आहे की, या निर्णयामुळे
या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया ताबडतोब सुरु करणे शक्य होणार आहे. 22 कि.मी. लांबीचा
हा सागरी सेतू मुंबईत शिवडी येथे सुरु होणार असून चिर्लेमार्गे राष्ट्रीय महामार्ग
4 बीला जाऊन मिळणार आहे. 9630 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प सार्वजनिक – खासगी भागीदारीत
उभारला जाणार असून तो पाच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने
आज घेतलेला निर्णय अतिशय महत्वपूर्ण असून महामुंबईचे (एमएमआर) स्वप्न साकार होण्यातील
हा प्रमुख टप्पा आहे. हा प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन
करण्याचे आदेशही श्री. चव्हाण यांनी दिले आहेत.
00000000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा