राज्यात औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात
परदेशी गुंतवणूकदारांना वाव
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 16 : राज्यात औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात गुंतवणूक
करण्यास वाव असून परदेशी गुंतवणूकदारांना यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविल्या
जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
इंग्लंडचे
पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांच्या आगामी भारत दौऱ्यासंदर्भात इंग्लंडचे व्यापार मंत्री
लॉर्ड ग्रीन यांनी शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व व्यापार आणि गुंतवणूक
संदर्भात चर्चा केली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी
सुमित मलिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव, महाराष्ट्र औद्योगिक
विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिषकुमार
सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई
शहरात पायाभूत सुविधांना चालना मिळण्यासाठी परिवहन सेवेचे बळकटीकरण करण्यात येत असून
मोनो रेल, मेट्रो रेल आणि ट्रान्स हार्बर लिंक यांची कामे प्रगतीपथावर आहेत असे सांगून
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात अजिंठा, वेरुळ सारखी जागतिक किर्तीची अनेक पर्यटन
स्थळे असून पर्यटन क्षेत्रात देखिल गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.
परदेशी गुंतवणूकदारांचे राज्यात स्वागत केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा