इंदू मिलची
जागेच्या हस्तांतरणाबाबत
शिष्टमंडळ
पंतप्रधानांनाही भेटले
मुख्यमंत्री चव्हाण
अधिकृत घोषणेबाबत आशावादी
नवी दिल्ली,
4 डिसेंबर : इंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेब
आंबेडकर स्मारकासाठी देण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत एका
शिष्टमंडळाने पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची आज सायंकाळी भेट घेतली. “आता कुठलीही
अडचण येणार नसून 6 डिसेंबरपूर्वी या संदर्भात घोषणा होईल”, असा आशावाद
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या भेटीनंतर संसद भवनात पत्रकारांसमोर व्यक्त
केला.
या
पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कालपासून दिल्लीत आहेत. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री
आनंद शर्मा यांची काल भेट घेतल्यानंतर आज शिष्टमंडळासह दुपारी 12.30 वा. आनंद
शर्मा यांची पुन्हा भेट घेऊन विस्तृत चर्चा केली.
या घटनेचे
गांभीर्य शिष्टमंडळाने वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. या सकारात्मक
चर्चेनंतर पुन्हा हे शिष्टमंडळ आज सायंकाळी 6.30 च्या सुमारास पंतप्रधान डॉ.मनमोहन
सिंग यांना भेटले.
या भेटी
नंतर संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,
पंतप्रधानांनबरोबर सकारात्मक चर्चा झाली. शिष्टमंडळाचे म्हणणे पंतप्रधानांनी ऐकून
घेतले, गांभीर्य त्यांना समजावून सांगण्यात आले. एकंदरीत 6 डिसेंबर पूर्वी घोषणा
होईल, याबाबत मी आशावादी आहे.
या शिष्टमंडळात
मुख्यमंत्री यांच्यासह केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा, संसदीय कार्य
राज्यमंत्री राजीव शुक्ला, केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतिक पाटील, केंद्रीय
माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री मिलींद देवरा, खा.विलास मुत्तेमवार, खा.एकनाथ
गायकवाड, खा.माणिकराव गावित, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, खा.दत्ता
मेघे, खा.भालचंद्र मुणगेकर, खा.विजय दर्डा, खा.भास्करराव पाटील खतगांवकर,
खा.अविनाश पांडे, खा.प्रिया दत्त, खा.जयवंत आवळे, खा.सुरेश टावरे, खा.हुसेन दलवाई,
खा.बळीराम जाधव, खा.मारोतराव कोवासे आदींचा समावेश होता.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा