शनिवार, १० नोव्हेंबर, २०१२


पायाभूत सुविधा क्षेत्राचा वेगवान विकास
हे  केंद्राचे महत्वाकांक्षी उद्दीष्ट
-         डॉ. मनमोहन सिंग
-         मुंबई  दि 10: - मुंबई ट्रान्स हर्बर लिंकसह राज्यातील विविध प्रकल्पांची तातडीने अंमलबजावणी करणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान
डॉ. मनमोहन सिंग यांनी आज येथे केले.
-                      इकॉनॉमिक्स टाईम्सच्या कॉर्पोरेट एक्सलन्स अवार्ड वितरण प्रसंगी ते बोलत होते. या समारंभास राज्यपाल के. शंकरनारायणन , मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , केंद्रिय मंत्री कपिल सिब्बल , केंद्रीय मंत्री आनंद शर्मा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. माँटेकसिंग अहलुवालीया , आधारचे  प्रमुख नंदन निलेकणी , इकॉनॉमिक्स टाईम्सचे विनित जैन आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
        पुढे बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, आम्ही पायाभूत विकासासाठी महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठरविले असून मंत्रीमंडळामार्फत त्याचा  सातत्याने आढावा होतो. यात मुंबईतील एलीव्हेटेड रेल कॉरीडॉर , नवीन लोकोमोटीव्ह प्लॅन्ट्स, नवी मुंबई येथील नवीन विमानतळ , आदी प्रकल्प आहेत . बाराव्या पंचवार्षिक योजनेत जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान – 2 मधून मुंबई ट्रान्स  हर्बर लिंक मार्गी लागेल असेही ते म्हणाले
     पुढे पंतप्रधान म्हणाले की,  अर्थव्यवस्थेत जागतिक पातळीवर चढउतार होत आहेत त्यासंदर्भात आपण  काही करु शकत नसलो तरी ,  आपल्या स्वत:च्या कमतरता ओळखून त्या सुधारु शकतो तसेच आर्थिक विकासासाठी नविन संधी निर्माण करू शकतो, रोजगार निर्माण करु शकतो आणि हीच आपल्यासमोरील आव्हाने आहेत.
        विविध प्रकल्प हे निधी, परवानगी आदींसाठी अडचणीत येत असल्याने त्यास गतीमान करण्याचाही प्रयन्त करीत आहोत. यासंदर्भात नुकतेच केंद्रशासनाने विविध पाऊले उचलली असून त्याद्वारे त्याचा विचार केला जाईल. विविध सामाजिक, राजकीय , अडचणी असून केंद्राने ही पाऊले उचलली आहेत. तसेच आधारसारख्या महत्वाच्या प्रकल्पाद्वारे सरकारी योजना थेट  लाभधारकांपर्यंत पोहचण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी सांगीतले.   
     इकॉनॉमिक्स टाइम्स अवॅार्डच्या सर्व प्रभावी  व सृजनशिल विजेत्यांचे पंतप्रधानांनी विशेष अभिनंदन करुन महाराष्ट्रातील जनतेला दिपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
अवार्डचे वितरण

 पंतप्रधानांच्या हस्ते लाईफ टाईम अचिव्हमेंट हे अवार्ड – ओबेरॉय ग्रुपचे पृथ्वीराज सिंगओबेराय यांना देवून सन्मानित करण्यात आले तसेच इतर अवार्डसही त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये कॉर्पोरेट सिटीजन ऑफ द ईअर अवार्ड – आदित्य  बिर्ला ग्रुप , इंटरप्र्युनर्स ऑफ द इअर अवार्ड – डॉ देवी शेट्टी , इमरनिंग ज्युबिलीअंट कंपनी ऑफ द ईयर अवार्ड – जुबलट फूड वर्क , कंपनी ऑफ द इअर अवार्ड – एचडीएफसी बँक्सचेआदित्य पुरी , ग्लोबल इंडियन ऑफ  द इअर अवार्ड – अंशू जैन , बिजनेस लीडर ऑफ द ईअर  - अनिल अग्रवाल ,  या  पुरस्कार विजेत्यांचा  समावेश आहे. या समारंभास देशातील विविध क्षेत्रातील उद्योगपती मोठया संखेने उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा