शनिवार, १० नोव्हेंबर, २०१२


                       पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मुंबईत आगमन
 मुंबई : दि. 10
            भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दोन दिवसाच्या मुंबई भेटीसाठी आज येथे छत्रपत्री शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या खास विमानाने आगमन झाले महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायण, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी , वस्त्रोद्योगमंत्री नसीम खान मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी पंतप्रधानांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानतळावर राज्याचे मुख्यसचिव जयंतकुमार बांठीया , मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलीक तिन्ही दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा