पिण्याच्या पाण्याचा योग्य व
काटकसरीने वापर
होण्यासाठी मीटर बसविणे
आवश्यक
-
मुख्यमंत्री
मुंबई, दि. 22 :
पिण्याचे शुध्द पाणी प्रत्येक नागरिकाला मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
यासाठी पाण्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचा योग्य व
काटकसरीने वापर होण्याच्या यादृष्टीने पाणी ग्राहकासाठी पाण्याचे मीटर बसविणे
आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज बैठकीत सांगितले.
पाणी पुरवठा
व स्वच्छता विभागाच्या महाराष्ट्र जीवन
प्राधिकरणातर्फे आज मंत्रालयात सादरीकरण
करण्यात आले. यावेळी पाणी
पुरवठा व स्वच्छता मंत्री
प्रा. लक्ष्मण ढोबळे, राज्यमंत्री
रणजित कांबळे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान
सचिव ए. के. जैन, पाणी
व पुरवठा स्वच्छता विभागाच्या प्रधान
सचिव श्रीमती मालिनी शंकर,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य
सचिव राधेश्याम मोपलवार आदी
उपस्थित होते.
राज्यातील शहरी
तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक पाणी ग्राहकाने गरजे इतकेच पाणी वापरावे यासाठी
पाण्याचे मीटर बसविण्याबाबत प्राधान्याने विचार करणे गरजेचे असल्याचे
मुख्यमंत्री यावेळी सांगितले. यासाठी
पाण्याच्या वापराचे मोजमाप करणारे मीटरचे तांत्रिक दृष्टया उत्तम डिझाईन करुन
घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. पिण्याच्या पाण्याच्या नियोजनबध्द
वापरासाठी लवकरच संबंधितांची बैठक आयोजित करुन त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला
जाईल असे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
पाण्याची गळती
थांबविणे, घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन करणे, 15 ते 20 टक्के काम शिल्लक
राहिलेल्या पाणी पुरवठा योजनांचे काम
पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्राधान्य देणे आदी कामांना प्राधान्य देणे
आवश्यक असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी यावेळी
सांगितले.
पाणी पुरवठा व
स्वच्छता विभागातंर्गत वासो, आर एस पी एम यू, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या प्रमुख
पाणी पुरवठा विभागांसह उपविभागांची सद्यस्थिती, त्यांच्या समस्या, त्यावर
करावयाच्या उपाय योजना, या विभागांच्या आस्थपनेवरील अधिकारी / कर्मचारी यांचे
व्यवस्थापन याबद्दलची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे मांडण्यात आली.
0 0 0 0
0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा