माजी
राज्यमंत्री हातणकर यांच्या निधनाने
कोकणातील
अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपले
मुंबई,
दि. 22 : कोकणाच्या विकासासाठी सतत
कार्यरत राहिलेले लक्ष्मणराव उर्फ भाई
हातणकर यांच्या निधनाने कोकणातील कुशल संघटक आणि अजातशत्रू व्यक्तीमत्व गमावला
असल्याची भावना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, "सामाजिक
कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी आणि राज्यमंत्री म्हणून काम करीत असताना भाईंनी सर्वसामान्यांना
वेळोवेळी न्याय दिला. गोरगरिबांचे आधारवड
असलेल्या भाईंचे अष्टपैलू व्यक्तिमत्व साऱ्यांसाठी आदर्शवत असे होते. स्वच्छ चारित्र्य असलेले भाई अजातशत्रू होते.
निष्ठा आणि तत्वाशी कसे इमान राखावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते.
जिल्ह्यात काँग्रेस रुजविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.
भाईंच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने कोकणातील एक ज्येष्ठ नेता गमावला आहे.
राज्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या विभागांच्या अनेक योजनांना गती देण्यात
महत्वाची भूमिका निभावली. राजापूर हा
त्यांचा मतदार संघ असल्याने कोकणात विविध विकासाच्या योजना त्यांनी आणल्या. कोकणात काँग्रेस मजबूत व्हावी तसेच विकासाच्या
योजना मार्गी लागाव्यात यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या जाण्याने पक्षाने एक चांगला
मार्गदर्शक गमावला आहे".
0 0 0 0
0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा