पुणे,
दि .16 : दुष्काळी परिस्थिती व जागतिक मंदीची परिस्थिती लक्षात घेता शेतीत ज्ञान, तंत्रज्ञान व व्यवस्थापन याचा उपयोग
करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
श्री
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 15 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ श्री. चव्हाण
यांचे हस्ते आज कासारसाई-दारुंब्रे ता. मुळशी येथे झाला. याप्रसंगी आयोजित
कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहकारमंत्री हर्षवर्धन
पाटील हे होते. माजी खासदार अशोक मोहोळ, माजी मंत्री मदन बाफना, माजीमंत्री
चंद्रकांत छाजेड, खासदार गजानन बाबर, आमदार विलास लांडे, जिल्हाधिकारी विकास
देशमुख, पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल
कवडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
हवामानातील
बदलामुळे कमी प्रमाणात पडणारा पाऊस यामुळे राज्यापुढे पाण्याचे योग्य वाटप कसे
करावयाचे प्रश्न निर्माण झाला असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, साखर उद्योग
वाढीमुळे ऊसलागवडीचे क्षेत्र वाढले. ऊसाला पाणी भरपूर लागते. दिवसें-दिवस पाणी
साठे कमी होत आहे. याचा विचार करुन शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ठिबक
सिचंनाचा वापर करावा. ऊस लागवडीसाठी पट्टापद्धत वापरावी. यावर्षी दुष्काळसदृश्य
परिस्थितीमुळे ऊस लागवड क्षेत्र कमी होणार असल्याने ऊसाचे उत्पादन काही प्रमाणात कमी होणार आहे.
याचा साखर उद्योगाने विचार करुन यावर्षी काळजीपूर्वक, योग्य व्यवस्थापन करुन
उद्योग चालवावा. खाजगी साखर कारखान्याच्या स्पर्धेचा विचार करुन सहकार क्षेत्रातील
साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर भर द्यावा असे ते म्हणाले.
अध्यक्षीय
भाषणात मार्गदर्शन करताना सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, संत तुकाराम
सहकारी कारखान्याने सामान्य शेतकऱ्याचे हित जपण्याचे काम केले. शेतकऱ्यानी उत्पादन वाढीसाठी शेतीमध्ये आधुनिक
तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. साखर कारखान्यानी व्यवसायवाढीसाठी उपपदार्थाची
निर्मिती करावी, असे ते म्हणाले.
साखर
कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष विदुरा नवले यांनी प्रास्ताविक केले.
कारखान्याचे
संचालक, सदस्य, पंचकोशीतील पदाधिकारी शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा