शनिवार, २० ऑक्टोबर, २०१२



अवर्षण प्रवणक्षेत्रातील सिंचन क्षेत्रास प्राधान्य
                                       - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
     पुणे, दि. 20 :अवर्षण प्रवण क्षेत्रातील सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहेत्याला अनुसरून 2200 कोटी रूपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
     इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी  एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण आज श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलेत्या निमित्ताने संस्थेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होतेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनमंत्री पतंगराव कदम हे होतेसहकार संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पशुसंवर्धन दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार माणिकराव ठाकरे, जिजाऊ महिला बचत गट फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
     मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, सध्या राज्यातील बऱ्याच भागात कमी पावसामुळे टंचाईचे सावट उभे राहिले आहेगेल्या वर्षाच्या टंचाई काळात राज्य शासनाने लोकांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि रोजगार हमी योजनेच्या विविध कामातून या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला आहेलोकांना व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या कामास राज्य शासनाने विशेष प्राधान्य दिले आहेत्याला अनुसरूनच अवर्षण प्रवण क्षेत्रातील सिंचन योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने 2200 कोटी रूपयाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविलेला आहे. कर्मवीर शंकरराव पाटील यांनी इंदापूर तालुक्यात शिक्षण, सहकार व ग्रामविकासक्षेत्रात केलेले कार्य गौरवास्पद असल्याचे नमूद करून श्री. चव्हाण म्हणाले की, राज्याच्या सहकारक्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहेज्ञानाधिष्ठीत समाजच आजच्या विविध आव्हानांना समर्थपणे तोंड देऊ शकतो म्हणून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे कार्य शिक्षण संस्थांनी करायला पाहिजेविद्यार्थ्यांमध्ये प्रयोगप्रवण अशी कल्पकता निर्माण करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे.
     कै. कर्मयोगी शंकरराव पाटील यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थातून 20 हजाराहून अधिक विद्यार्थी अभ्यास करीत असल्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी केलेल्या भाषणात सांगितलेसंस्थेच्या वतीने अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व एम.बी. . चा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.



     कै. शंकररावजी पाटील यांनी सहकारक्षेत्रात केलेले कार्य राज्यात अभिमानास्पद असल्याचे पतंगराव कदम यांनी यावेळी केलेल्या अध्यक्षीय भाषणात सांगितलेशिक्षण व सहकाराच्या क्षेत्रातूनच ग्रामीण विकासाला चालना देण्याची शक्ती मिळतेअसेही त्यांनी सांगितले.
     प्रारंभी कै. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या पूर्णाकृती तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेशिवाजी एज्युकेशन सोसायटीचे सचिव उदयसिंह पाटील यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या कार्याची माहिती दिलीशेवटी उमेश सुर्यवंशी यांनी आभार मानले.
     या कार्यक्रमास ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा