शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१२


                             
मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाचे उदघाटन
उस्मानाबाद, दि. 19 –तुळजापूर येथील 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे उदघाटन आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.
यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, सहकार व पणनमंत्री हर्षवर्धन पाटील, पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, खा. डॉ. पद्मसिंह पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील,    आ. बसवराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, विभागीय आयुक्त्‍संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे आणि लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. अशफाक अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली.
उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्त्री-रुग्ण कक्ष, बालरुग्ण कक्ष, दंत व नेत्र चिकित्सा कक्ष, क्ष-किरण कक्ष, शस्त्रक्रिया विभाग, आयुष कक्ष, बालरुग्ण कक्ष, औषण वितरण कक्ष रुग्णांसाठी कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. अशफाक अहमद यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिली.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
*****

शेतमालाच्या हमी भावासाठी नाफेडची
जास्तीत जास्त खरेदी केंद्रे सुरु करू - मुख्यमंत्री चव्हाण
उस्मानाबाद, दि. 19 - शेतीमालाला किमान आधारभूत किंमती नुसार चांगला भाव मिळावा यासाठी  नाफेडची जास्तीत जास्त खरेदी केंद्रे  सुरू होतील असे प्रयत्न  करण्याची ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज तुळजापूर येथील शेतकरी मेळाव्यात दिली.
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलांचे उदघाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी हा शेतकरी मेळावा झाला. यामेळाव्यात त्यांनी ही ग्वाही दिली. अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील होते. यावेळी पशू संवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री  मधुकरराव चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, खासदार डाँ. पद्मसिंह पाटील यांच्यासह आमदार सर्वश्री बसवराज पाटील, वैजनाथ शिंदे, राणाजगजीतसिंह पाटील,  राज्य परिवहन महा मंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्यासह तुळजापूरच्या नगराध्यक्षा सौ. अर्चनाताई गंगणे, तुळजापूर प्राधीकरणाचे सदस्य नरेंद्र बोरगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तुळजापूर बाजार समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचे कै.विलासराव देशमुख व्यापारी संकुल असे नामकरण करण्यात आले आहे. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, स्वतःच्या हिमतीवर आणि कोणतेही कर्ज न घेता तुळजापूर बाजारसमितीने हे 65 गाळ्यांचे हे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. त्याचे यथोचित असे विलासराव देशमुख असे नामकरण करण्यात आले आहे, हा कै. देशमुख यांची  स्मृती जपण्याचा प्रय़त्नही चांगला आहे.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी टंचाईचा आढावा घेताना उस्मानाबाद जिल्ह्यातील परिस्थितीचा उहापोहही केला. ते म्हणाले, जिल्हयातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येतील. मराठवाड्याला कृष्णा खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून दिले पाहीजे, ही शासनाची भुमिका आहे. प्राप्त परिस्थितीत ज्या प्रकल्पांचे काम पुर्णत्त्वाकडे जात आहे, त्यांना प्राधान्याने निधी देणे योग्य ठरेल.
पाण्याचा वापर आता जपून करण्याची  गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी शास्त्रीय दृष्टीकोन बाळगावा लागेल. पाण्याचा ठिबक सिंचनासारख्या तंत्राद्वारे काटेकोर आणि काटसरीने वापर करावा. जलसिंचनासाठीची उपाय योजना पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्याची परिस्थिती  निर्माण झाली आहे, याचा विचार करून, पाणी वापराचे व्यवस्थापन करावे लागेल.
शेती मालाच्या दराबाबत मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, उडीद, मुग आणि सोयाबीन यांच्या खरेदीसाठी नाफेडची खरेदी केंद्र राज्यात सुरु व्हावीत यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येताच, त्याचे दर कोसळू नयेत व शेतमालाचा योग्य रितीने उठाव व्हावा. त्यामध्ये शेतकऱ्यांची  कुठल्याही पद्धतीने अडचण होऊ नये यासाठी नाफेडकडे पाठपुरावा करून, जास्तीत जास्त खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न राहील. 
अध्यक्षीय भाषणात कृषी व पणन मंत्री विखे-पाटील म्हणाले, बाजार समित्यांना कोल्ड स्टोरेज, गोडावून्स, भारतीय वखार महामंडळाच्या माध्यमातून वायदे बाजार अशा बाबींद्वारे टप्प्या-टप्प्याने अद्ययावत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. वायदे बाजारांचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी कृषि व पणन मंत्रालय एकत्र करण्याचा प्रयोग केला. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन आणि त्यांचे पणन यात समन्वय साधता येऊ लागला आहे. सरकारची प्राथमिकता शेतकरी हीच आहे. यावेळी श्री. विखे-पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्मातील पशुधनाच्या हितासाठी नऊ हजार हेक्टरवर चारा निर्मिती केली जाईल. त्यासाठी शंभर टक्के अनुदानाद्वारे मका व ज्वारीचे बियाणे उपलब्ध करून दिले जाईल, असेही सांगितले.
यावेळी  पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची समयोजित भाषणे झाली. मेळाव्यात माजी आमदार शिवाजीराव बाभळगावकर यांना श्रद्धांजली  अर्पण करण्यात आली. तुळजापूर बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्यासपीठावर कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदी उपस्थित होते. मेळाव्याला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***

तुळजाभवानी मंदिरातील सौर ऊर्जा प्रकल्पाचे
मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन
उस्मानाबाद, दि. 19 - तुळजापूर विकास प्राधीकरणातर्फे तुळजापुरातील                 श्री. तुळजाभवानी  मंदिरात कार्यान्वित करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे आज राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी  मुख्यमंत्री चव्हाण यांनी नवरात्रोत्सवाच्या औचित्य साधून श्री तुळजाभवानीचे दर्शनही घेतले.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास तथा उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, कृषि व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री  सुरेश शेट्टी, खासदार डॅ. पद्मसिंह पाटील, आमदार बसवराज पाटील, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासह, विभागीय आय़ुक्त संजीव जयस्वाल, तुळजापूर विकास प्राधीकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी के. एम. नागरगोजे, प्राधीकरणाचे सदस्य आप्पासाहेब पाटील, नरेंद्र बोरगांवकर, तुळजापुरच्या नगराध्यक्षा सौ. अर्चना गंगणे, माजी आमदार आलुरे गुरूजी, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, विश्वास शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या सौर ऊर्जा प्रकल्पाची  क्षमता 81 कीलो वॅटची असून, त्याद्वारे  दररोज 200 युनिटसची निर्मिती अपेक्षित आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील प्रशासकीय इमारत, पोलिस चौकी, मंदिर परिसरातील पथदिवे, धार्मिक कार्यालये, शिवाजी दरवाजा, देवीचा गाभारा, अभिषेक हाँल येथे विनाखंडीत विजपुरवठा सुरु राहणार आहे.
उदघाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह उपस्थित मंत्र्याचा                श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.
*****


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा