शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१२


वादग्रस्त चित्रपटांच्या प्रसारणावर बंदी
 घालण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती
केंद्राकडुन गांभिर्याने विचार सुरु

मुंबई, दि. 14 : अमेरीकेतील सोशल नेटवर्किंग साईटसवर काही वादग्रस्त चित्रपटाचे प्रसारणामुळे भारतातील सामा‍जिक सौहार्द बिघडण्याची शक्यता असल्याने अशा साईटसवर केंद्र सरकारने तात्काळ बंदी घालावी, अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला केली आहे.
                समाजातील सौहार्द व सलोखा कायम रहावा, गणेशोत्सवाचा सण शांततेच्या वातावरणात पार पडावा, यासाठी ही बंदी तात्काळ घालावी. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.  या संदर्भात केंद्र सरकार गांभीर्याने लक्ष घालीत आहे, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
                महाराष्ट्रात विविध जातीधर्माचे, पंथांचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत.  धार्मिक किंवा भावनिक कारणांवरुन या सलोख्याला धोका पोहचू नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा