कर्तृत्ववान आणि उमदे व्यक्तिमत्व
अकाली हरपले : मुख्यमंत्री चव्हाण
मुंबई, दि. 9 : माजी आरोग्यमंत्री
दिग्विजय खानविलकर यांच्या निधनाने एक कर्तृत्ववान आणि उमदे व्यक्तिमत्व अकाली हरपले
आहे. जनसामान्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले खानविलकर अतिशय सुजाण आणि विनम्र होते.
त्यांची उणीव कार्यकर्त्यांना सतत जाणवत राहिल, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी शोकसंदेशात
म्हटले आहे की, करवीर विधानसभा मतदारसंघातून श्री. खानविलकर यांनी सलग 25 वर्षे प्रतिनिधीत्व
केले. त्यांचा मतदारसंघ कोल्हापूर शहर आणि लगतचा ग्रामीण भाग असा संमिश्र होता. मात्र
मोठ्या जनसंपर्कामुळे आणि दोन्ही भागातील समस्यांची चांगली जाणिव असल्याने ते सहज निवडुन
येत असत. राज्याचे आरोग्यमंत्री म्हणुनही त्यांची कारकिर्द उल्लेखनीय होती. गेली काही
वर्षे ते सक्रिय राजकारणापासून थोडे दुर होते. मात्र सामाजिक कार्यात ते सातत्याने
भाग घेत होते. कोल्हापुरातील कला, क्रीडा, सामाजिक चळवळीला त्यांचा मोठा आधार होता.
विशेषत: युवकांमध्ये ते फार लोकप्रिय होते. त्यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे, असे
श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा
असताना श्री. खानविलकर यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले होते, याचा आवर्जून
उल्लेख श्री. चव्हाण यांनी केला आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा