शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२


ओव्हल मैदान ते विरार एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडोरचे सादरीकरण
मुंबईकरांसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प
                                                                   - मुख्यमंत्री
        मुंबई, दि.10: ओव्हल मैदान ते विरार एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडोरचे सादरीकरण आज पश्चिम रेल्वे मंत्रालयाचे महाव्यवस्थापक महेशकुमार यांनी आज मुख्यमंत्र्यांसमोर केले.
            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या सादरीकरण प्रसंगी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल अस्थाना, मुंबई महानगरपलिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, नगरविकास प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे सचिव नितिन करीर, आशिषकुमार सिंह, रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पश्चिम रेल्वे व राज्य शासनाचे वरिष्ठ शासकीय आधिकारी उपस्थित होते.
            मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असलेल्या 60 किमी लांबीच्या प्रकल्पामध्ये 26 स्थानके आहेत. यातील 5 स्थानके अंडरग्राऊंड, 19 स्थानके एलिव्हेटेड तसेच 2 स्थानके जमिनीवरची अशी असून या मार्गावर 15 डब्यांच्या गाड्या चालविण्यात येतील.  
            सुमारे 17 हजार 836 कोटी खर्चाच्या या प्रकल्पासाठी बेस्ट, रिलायन्स, महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी बोर्ड, टाटा पॉवर, एमटीएनएल,  महानगरपालिका, बीएसएनएल, गेल, एमजीएल आणि पश्चिम रेल्वे आदी विभाग कार्यरत राहतील.
            लवकरच या प्रकल्पाला अंतिम स्वरुप देण्यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधान कार्यालय, नियोजन आयोग आदीं समवेत चर्चा करणार आहेत. या प्रकल्पाची पुढील आवश्यकती कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना यावेळी निर्देश दिले.
 
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा