शनिवार, ११ ऑगस्ट, २०१२


मुंबईतील परिस्थिती नियंत्रणाखाली;
अफवांवर विश्वास ठेऊ नकामुख्यमंत्री

आज दुपारी मुंबईतील आझाद मैदान व सीएसटी परिसरात झालेल्या हिंसक कृत्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. आसाम आणि म्यानमारमधील घटनांचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत काही समाजकंटकानी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यास सुरुवात केली. परिसरात उभ्या असलेल्या गाड्या फोडण्यात आल्या. काही वृत्तवाहिन्यांची .बी. वहाने व इतर गाडया जाळण्यात आली. या हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. या घटनेत 45 पोलीस कर्मचारी व इतर 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. 
सभेसाठी जमलेले लोक अचानक हिंसक कसे झाले, यामागे कुणाचा हात आहे याची चौकशी करण्याचे आदेश गुन्हे शाखेला (क्राईम ब्रँच) देण्यात आलेले आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
शहरात व राज्यभर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.  संपूर्ण राज्यभर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या घटनेचे शहरात आणि राज्यात कोठेही हिंसक पडसाद उमटू नयेत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्रीय राखीव पोलीस बल, शिघ्र कृती दल (रॅपीड ॲक्शन फोर्स) व राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या राज्य पोलिसांच्या मदतीसाठी बोलाविण्यात आल्या आहेत. शहरातील वाहतूक, तसेच रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा