दुष्काळी परिस्थितीत मागेल त्याला काम देण्याचे
प्राधान्याने नियोजन करावे - मुख्यमंत्री
सातारा : दुष्काळी परिस्थितीत जनतेचे पशुधन जोपासण्यासाठी आवश्यकता आणि मागणीनुसार
छावण्या सुरु करण्याबरोबरच मागेल त्याला काम देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केली.
सातारा जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सर्किट हाऊस येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. चव्हाण बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, मुख्यमंत्र्याचे सचिव आशिषकुमार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भेासले, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी. एन., मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम देशपांडे, पोलिस अधिक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळी भागातील जनावरांच्या चारा छावणीसाठी चाललेल्या प्रस्तावावर आठ दिवसात निर्णय घेण्याचे आदेश देऊन मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, जनतेच्या मागणीनुसार चारा छावण्या उघडण्यास तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. याबरोबरच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अधिकाधिक कामे हाती घेण्याचे नियोजन करुन मागेल त्याला काम देण्याची तयारी ठेवावी. जिल्ह्यात प्रत्येक गावात किमान एक तरी काम सुरु करण्याबाबत प्रशासनाने नियोजन करावे. रोजगार हमीच्या कामाची मजुरी 15 दिवसात देण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना केली. हे काम अधिक उठावदार व्हावे यासाठी कंत्राटी पध्दतीने यंत्रणा निर्माण करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
जिल्ह्यात गेल्या चार-साडेचार महिन्याच्या कालावधीत 16 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीस तोंड देण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यास राज्य शासन कटिबध्द असल्याचे स्पष्ट करुन मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, दुष्काळ निवारणासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज आणि सतर्क असून दुष्काळग्रस्तांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, चारा छावण्या आणि नरेगातून अधिकाधिक कामे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले आहे.
सिंचनाच्या दीर्घकालीन उपाययोजना सुरुच राहतील. मात्र तातडीच्या उपाययोजना करुन अल्पावधीत पाणी उपलब्ध होणारे प्रकल्प निवडून त्यांना लागणारा निधी उपलब्ध करुन देवून त्याद्वारे टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले.
दुष्काळी भागातील जनावरांना चारा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने प्रशासनामार्फत चारा लागवड मोहिम अधिक गतीमान करण्याची सूचना करुन मुख्यमंत्री म्हणाले, चारा लागवडीसाठी कृषी विभागाकडील वैरण विकास कार्यक्रमाकडून प्रशासनाने नियोजन करावे. यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यास शासन प्राधान्य देईल. चारा उत्पादन करताना तो स्थानिक परिसरात प्राधान्याने करावा. सातारा जिल्ह्यात 20 हजार हेक्टर क्षेत्रावर चारा लागवडीचे नियोजन करुन जवळपास 5 लाख मे. टन. चारा उत्पादन करण्याचे नियोजन असल्याचे विभागीय आयुक्त श्री. देशमुख यांनी सांगितले.
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेवून टंचाईग्रस्त भागात पिण्याचे पणी उपलब्ध करुन देण्याबाबत प्रशासनाने तयार केलेल्या आपत्कालीन आराखड्यावरही मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी सविस्तरपणे चर्चा केली. या आराखड्यामध्ये सध्याचे टँकर भरण्याचे ठिकाण आणि कोणत्या तारखेपर्यत पाणीसाठा पुरेल आणि आपत्कालिन परिस्थितीत टँकर भरण्याचे प्रस्तावित ठिकाण याबाबतच्या नियोजनावरही यावेळी सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. तसेच नगरपालिका क्षेत्रातही पाणीपुरवठयाबाबत नियोजन आराखडा तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कृषी विभागामार्फत दुष्काळ निवारणासाठी करावयाच्या दीर्घ मुदतीच्या उपायायोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला यामध्ये केटीबंधारे, सिमेंटबंधारे, ट्रिपल आर मध्ये माती नाला बांध यासह अन्य कामांचे करण्यात आलेले नियोजन सांगण्यात आले. 1972 च्या दुष्काळातील पाझर तलावातील गळती रोखण्यासाठी जलरोध चर उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 1 कोटीचा निधी खर्चून 35 तलावांची दुरुस्ती करण्यात आल्याचे यावेळी सांगून दुष्काळी भागातील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती आवश्यकतेनुसार गेट करणे तसेच मातीनाला बंधातील गाळ लोकसहभागातील काढण्याच्या सुरु असलेल्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात 26 चारा छावण्या
सुरुसातारा जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सर्किट हाऊस येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. चव्हाण बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, मुख्यमंत्र्याचे सचिव आशिषकुमार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भेासले, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी. एन., मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम देशपांडे, पोलिस अधिक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळी भागातील जनावरांच्या चारा छावणीसाठी चाललेल्या प्रस्तावावर आठ दिवसात निर्णय घेण्याचे आदेश देऊन मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, जनतेच्या मागणीनुसार चारा छावण्या उघडण्यास तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. याबरोबरच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अधिकाधिक कामे हाती घेण्याचे नियोजन करुन मागेल त्याला काम देण्याची तयारी ठेवावी. जिल्ह्यात प्रत्येक गावात किमान एक तरी काम सुरु करण्याबाबत प्रशासनाने नियोजन करावे. रोजगार हमीच्या कामाची मजुरी 15 दिवसात देण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना केली. हे काम अधिक उठावदार व्हावे यासाठी कंत्राटी पध्दतीने यंत्रणा निर्माण करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
जिल्ह्यात गेल्या चार-साडेचार महिन्याच्या कालावधीत 16 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीस तोंड देण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यास राज्य शासन कटिबध्द असल्याचे स्पष्ट करुन मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, दुष्काळ निवारणासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज आणि सतर्क असून दुष्काळग्रस्तांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, चारा छावण्या आणि नरेगातून अधिकाधिक कामे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले आहे.
सिंचनाच्या दीर्घकालीन उपाययोजना सुरुच राहतील. मात्र तातडीच्या उपाययोजना करुन अल्पावधीत पाणी उपलब्ध होणारे प्रकल्प निवडून त्यांना लागणारा निधी उपलब्ध करुन देवून त्याद्वारे टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले.
दुष्काळी भागातील जनावरांना चारा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने प्रशासनामार्फत चारा लागवड मोहिम अधिक गतीमान करण्याची सूचना करुन मुख्यमंत्री म्हणाले, चारा लागवडीसाठी कृषी विभागाकडील वैरण विकास कार्यक्रमाकडून प्रशासनाने नियोजन करावे. यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यास शासन प्राधान्य देईल. चारा उत्पादन करताना तो स्थानिक परिसरात प्राधान्याने करावा. सातारा जिल्ह्यात 20 हजार हेक्टर क्षेत्रावर चारा लागवडीचे नियोजन करुन जवळपास 5 लाख मे. टन. चारा उत्पादन करण्याचे नियोजन असल्याचे विभागीय आयुक्त श्री. देशमुख यांनी सांगितले.
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेवून टंचाईग्रस्त भागात पिण्याचे पणी उपलब्ध करुन देण्याबाबत प्रशासनाने तयार केलेल्या आपत्कालीन आराखड्यावरही मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी सविस्तरपणे चर्चा केली. या आराखड्यामध्ये सध्याचे टँकर भरण्याचे ठिकाण आणि कोणत्या तारखेपर्यत पाणीसाठा पुरेल आणि आपत्कालिन परिस्थितीत टँकर भरण्याचे प्रस्तावित ठिकाण याबाबतच्या नियोजनावरही यावेळी सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. तसेच नगरपालिका क्षेत्रातही पाणीपुरवठयाबाबत नियोजन आराखडा तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कृषी विभागामार्फत दुष्काळ निवारणासाठी करावयाच्या दीर्घ मुदतीच्या उपायायोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला यामध्ये केटीबंधारे, सिमेंटबंधारे, ट्रिपल आर मध्ये माती नाला बांध यासह अन्य कामांचे करण्यात आलेले नियोजन सांगण्यात आले. 1972 च्या दुष्काळातील पाझर तलावातील गळती रोखण्यासाठी जलरोध चर उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 1 कोटीचा निधी खर्चून 35 तलावांची दुरुस्ती करण्यात आल्याचे यावेळी सांगून दुष्काळी भागातील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती आवश्यकतेनुसार गेट करणे तसेच मातीनाला बंधातील गाळ लोकसहभागातील काढण्याच्या सुरु असलेल्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात आजमितीस 39 चारा छावण्या मंजूर केल्या असून यापैकी 26 चारा छावण्या सुरु असून सुमारे 31 हजार 883 इतकी जनावरे आहेत. या जनावरांसाठी बार कोडींगची पध्दत अवलंबली आहे. तसेच जिल्ह्यात सध्या 206 गावे आणि 893 वाड्यांना 273 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच 213 विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत 1219 कामे सुरु असून यंदा अधिकाधिक खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील 123 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला असला तरी गाववार नजर पैसेवारी व अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतरच या सुविधा प्राधान्याने उपलब्ध होतील. तथापि दुष्काळ निवारणाच्या कामासाठी राज्य शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. दुष्काळाच्या परिस्थितीतीचा दर आठवड्याला मंत्रीमंडळाच्या समितीकडून आढावा घेतला जात असून आवयश्कतेनुसार दुष्काळाच्या उपाययोजनांमध्ये सुधारणा करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याचेही मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले.
यावेळी जिल्ह्यातील पर्जन्यमान, धरणातील पाणीसाठा, आपत्कालीन आराखडा, टँकर, चारा छावण्या आणि नरेगा अंतर्गत कामाची माहिती चारा लागवड अभियान, पेरण्याची व पिक परिस्थिती, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडे केलेले निधी मागणीचे प्रस्ताव यासह जिल्ह्यात सुरु असलेल्या दुष्काळाच्या उपाययोजना आणि कराव्या लागणाऱ्या संभाव्य उपाययोजनांवर तालुकानिहाय, सर्कलनिहाय आढावा घेण्यात आला.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी. एन यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि सुरु असलेल्या उपाययोजना आणि कराव्या लागणाऱ्या उपाययोजना याबाबत प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. यावेळी लोकप्रतिनिधींनीही दुष्काळ निवारणाच्या उपाय योजानाबाबत आपल्या सूचनाही मांडल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा