रमझान ईदनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा
मुंबई दि. 19 : मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी रमझान ईदनिमित्त राज्यातील मुस्लिम बांधवांना हार्दिक
शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात
की, रमझान महिन्यात उपवास करुन शरीरशुध्दी
व आत्मशुध्दी करण्याचा संदेश इस्लामने दिला आहे. रमझान हा शुध्दीकरणाचा
महिना मानला जातो. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करुन प्रेम आणि आनंदाने
साजरा करणारा सण अशी त्याची ओळख आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. हा दिवस
समाजात एकरुपता आणण्याचा संदेश देतो. सर्व बांधवांमध्ये प्रेम, सौहार्द वाढावे हाच
या सणाचा हेतू आहे. सर्वानी परस्पराबद्दल प्रेम व आदरभाव राखावा व सलोख्याचे
वातावरण निर्माण व्हावे, यासाठी असे सण खुप महत्वाचे कार्य करतात.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा