सोमवार, २० ऑगस्ट, २०१२



मुंबई  उच्च न्यायालयाचा इतिहास
उलगडणारे महत्वपूर्ण प्रदर्शन - मुख्यमंत्री
           मुंबई दिनांक 20 : मुंबई उच्च न्यायालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने भरविण्यात आलेले  प्रदर्शन न्यायालयाचा इतिहास उलगडणारे असल्याने अतिशय महत्वपूर्ण  आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज  व्यक्त केली.
           मुंबई उच्च न्यायालयाच्या सेंट्रल हॉलमध्ये भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाला आज मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक भेट दिली . मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश  मोहित शाह, सॉलिसिटर  राजन जयकर यावेळी उपस्थित होते.

          या प्रदर्शनातील दस्तावेज अतिशय दुर्मिळ आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचा प्रदीर्घ आणि गौरवशाली इतिहास प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना पाहण्यासाठी खुला करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी  सॉलिसिटर  राजन जयकर यांना धन्यवाद दिले. यावेळी श्री.राजन जयकर यांनी मुख्यमंत्र्यांना प्रदर्शनासंबंधी सविस्तर माहिती दिली.

          या प्रदर्शनात महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभाई पटेल, मोहम्मद अली जिना यांनी वकीलीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेताना केलेले अर्ज, त्यांना मिळालेली बॅरिस्टर पदवीची प्रमाणपत्रे, लोकमान्य टिळकांवरील देशद्रोहाच्या खटल्याच्या निकाला संबंधीचे कागदपत्र, जुन्या काळातील न्यायमूर्तीच्या खुर्च्या, न्यायदंड  मिग्नन कंपनीचा 1905 सालचा टाईपरायटर, जुन्या काळातील छायाचित्रे, मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीची प्रतिकृती आदी ठेवण्यात आले आहे. हे प्रदर्शन दिनांक 16 सप्टेंबर 2012 पर्यत सर्वांना मोफत पाहता येणार आहे.

00000

स्व. राजीव गांधी यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांचे विनम्र अभिवादन

          मुंबई दि. 20 :  माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या 68 व्या जयंतीनिमित्त कूपरेज मैदानातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र वाहून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. सार्व. आरोग्यमंत्री  सुरेश शेट्टी, खा. गुरुदास कामत, खा. एकनाथ गायकवाड, आ.माणिकराव ठाकरे, आ. कृपाशंकर सिंह,
आ. बलदेव खोसा, आ.ॲनी शेखर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
-------

          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा