शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१२


पारशी नववर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
मुंबई दि. 17 : पारशी नववर्षानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यभरातील पारशी समाजाला शुभेच्छा दिल्या आहेत.
        देशाच्या प्रगतीत पारशी बांधवांचे फार मोठे योगदान आहे. प्रामाणिकपणा आणि सचोटी ही वैशिष्टये जन्मत:च असलेल्या पारशी समाजाचे आपल्या देशाच्या प्रगतीत फार मोठे योगदान आहे. प्रेषित झरत्रुष्ट यांच्या चांगला विचार आणि चांगले कृत्य या शिकवणीचा अंगीकार प्रत्येकाने करावा असे आवाहन मुख्यमंत्री चव्हाण यांनी शुभेच्छा संदेशात केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा