गीतांना मराठमोळा ग्रामीण बाज देणाऱ्या
अवलिया संगीतकाराला मुकलो - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 30: संगीतकार बाळ पळसुले यांच्या निधनाने गीतांना अस्सल
मराठमोळा ग्रामीण बाज देणाऱ्या एका अवलिया संगीतकाराला आपण मुकलो असल्याची
प्रतिक्रिया मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री
चव्हाण शोकसंदेशात म्हणतात की, दिल्ली आकाशवाणीवरुन प्रसारित झालेल्या शाहीर
होनाजी बाळा आणि लोकशाहीर पठ्ठे बाबूराव यांच्या लोकगीतांना संगीत देऊन त्यांनी
अस्सल मराठमोळा ग्रामीण बाज असलेल्या संगीताला राष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून
दिली. सुमारे साडेचार शतके संगीत
क्षेत्रात ते कार्यरत होते. मराठी हिंदी,
गुजराथी, भोजपूरी अशा सुमारे 150 चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. अत्यंत
प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके, तसेच मराठी चित्रपट महामंडळाचा
चित्रकर्मी पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. थापाड्या, भिंगरी, फटाकडी, पंढरीची
वारी, गाढवाचं लग्न या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली. त्यांच्या निधनाने मराठी संगीताची फार मोठी
हानी झाली आहे”.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा