रविवार, ८ जुलै, २०१२


जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय
                                                                                  दि. 8 जुलै 2012.                                

                               पत्रकार परिषदेचे निमंत्रण

 सप्रेम नमस्कार,

        राज्य विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार, दि. 9 जुलै 2012 पासुन सुरु होत आहे. प्रथेनुसार मा. मुख्यमंत्री यांनी उभय सभागृहांमधील  मा. विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ सदस्यांना चहापानासाठी आज रविवार, दि. 8 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता सह्याद्री राज्य अतिथीगृहावर निमंत्रित केले आहे.

        चहापानाच्या कार्यक्रमानंतर सायं. 6 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे प्रेक्षागृहात (ऑडिटोरियम) मा. मुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. आपण कृपया, या पत्रकार परिषदेस उपस्थित रहावे, ही विनंती.  कळावे.

आपला स्नेहांकित,

सतीश  लळीत
                                      मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी

प्रति,

मा. संपादक/मुख्य प्रतिनिधी/ब्युरो चिफ/प्रतिनिधी,
सर्व दैनिके, वृत्तवाहिन्या.

पत्रकार परिषद
रविवार, दि. 8 जुलै रोजी
सायंकाळी 6 वाजता
सह्याद्री राज्य अतिथीगृह


(टीप : चहापानाचा कार्यक्रम लांबल्यास कदाचित पत्रकार परिषद थोडी उशीरा सुरु होईल. कृपया सहकार्य करावे, ही विनंती.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा