माजी खासदार बाळ आपटे यांच्या
निधनामुळे मुख्यमंत्र्यांना दु:ख
मुंबई,
दिनांक 18 जुलै : माजी राज्यसभा सदस्य श्री.बळवंत
परशुराम उर्फ बाळ आपटे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक
व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात की, प्रा.बाळ आपटे
एक संयमी आणि विद्वान खासदार म्हणून प्रसिध्द
होते. विचारवंत म्हणून ओळख असलेल्या
प्रा.आपटे यांनी राज्यसभेत अनेक महत्वाच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण विचार मांडले. नामांकित
विधीज्ञ म्हणूनही त्यांची कारकिर्द गाजली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी
सातत्याने आवाज उठवून विद्यार्थ्यांचे संघटन करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
मुंबई विद्यापीठात कायद्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी केलेली कामगिरीही लक्षणीय
होती. त्यांच्या निधनाने एक अनुभवी राजकीय
नेता आणि चांगला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा