कुस्तीगीर आणि अभिनेते असलेले
दारासिंग हे सहृदय व्यक्तिमत्व
-
मुख्यमंत्री
मुंबई, दिनांक 12 जुलै : कुस्ती,
अभिनय, समाजसेवा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे दारा सिंग यांचे
व्यक्तिमत्व भारदस्त आणि अतुलनीय होते.
त्यांच्या निधनाने एका बहुआयामी आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात घर केलेल्या
सहृदय व्यक्तीमत्वाला आपण सारे
मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्री.दारा सिंग
यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, “कुस्तीवीर म्हणून जनमानसात ओळखल्या जाणाऱ्या दारा सिंग
यांनी अभिनयाच्या क्षेत्रातही उंची गाठली. त्यांची बलदंड शरीरयष्टी आणि त्यांच्या
व्यक्तीमत्वाला साजेशा भूमिका त्यांना मिळाल्या. शंभरहून अधिक चित्रपटात त्यांनी
काम केले. विशेषत: दूरचित्रवाणीवरील गाजलेल्या रामायण या मालिकेतील त्यांची हनुमानाची
भूमिका प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहील.
रुस्तम-ए-हिंद या किताबाने त्यांना गौरविण्यात आले. राज्यसभेचे सदस्य म्हणूनही त्यांनी चांगली
कामगिरी केली. हिंदी चित्रपटातील पहिला
ॲक्शन हिरो अशी प्रतिमा असलेल्या दारा सिंग यांच्या निधनाने चित्रपट आणि कुस्ती
क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले आहे”
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा