यांचे उपोषण
मागे
मुंबई, दि. 7 जून : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी 4 जून पासून मुंबईत
सुरु केलेले बेमुदत आमरण उपोषण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर
मागे घेतले.
आज मंत्रालयात आमदार श्री. बच्चू कडू यांनी कोरडवाहू
शेतकऱ्यांना कायमस्वरुपी आर्थिक सहाय्य, डॉ.नरेंद्र जाधव समितीच्या शिफारशींची
अंमलबजावणी आणि डॉ. एम. एस. स्वामीनाथन् समितीच्या शिफारशीनुसार शेतमालाला हमी
भाव, अनुशेष, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, रोजगार हमी योजनेतून शेतीची कामे, ग्रामीण
घरकुल योजनाबाबत इत्यादी विषयांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल असे
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या शिफारशीच्या अंमलबजावणीकरिता
मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आमदार
बच्चू कडू यांनी सुचविलेल्या दोन प्रतिनिधींचा समावेश करून समिती स्थापन करणे,
तसेच कोरडवाहू शेतीला स्थैर्य देण्याकरिता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे. या समितीनी विदर्भातील प्रतिनिधी
यांचे मत विचारार्थ घेऊन कोरडवाहू शेती मिशन अंतिम करावे. प्रकल्पग्रस्तांची
सविस्तर यादी व सादरीकरण 15 दिवसात करावे, अशी सूचना प्रधान सचिव मदत व पुनर्वसन
यांना करून प्रकल्पाग्रस्तांचे धोरण निश्चित करावे, असे आदेश मा. मुख्यमंत्री
यांनी दिले.
यावेळी आमदार श्री. कडू यांनी पेरणी ते कापणीची कामे
रोहयोतून करणे, ग्रामीण घरकुल योजनेकरिता बीपीएलची अट काढावी, अशी मागणी केली. या
विषयांवर तसेच स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशीबाबत संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी
चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. वरील बाबींवर सहमती झाल्यानंतर
आमदार कडू यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले.
यावेळी आ. रवी राणा, आ. प्रा.शरद पाटील, धुळे, आ. निलेश
देशमुख-पारवेकर, आ. दिलीप सानंदा, डॉ. राजेंद्र गवई व वरिष्ठ अधिकारी, तसेच प्रहार
संघटनेचे विदर्भ प्रमुख संजय देशमुख, शेतकरी संघटनेचे विजय कडू, किसान मित्रचे डॉ.
मधुकर गुंबळे, डॉ. किशोर मोघे, बाळा
जगताप, गजानन कुबडे, वैभव मोहिते, प्रविण हेडवे, रूपेश घागी, प्रकल्पग्रस्त
संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पावडे, विनोद राऊत, किशोर भोसले, सुहास गोलांडे उपस्थित
होते.
-----0-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा