बुधवार, १३ जून, २०१२


कोयना अभयारण्यातील 14 गावे
वगळण्यास केंद्राकडून हिरवा कंदील
नवी दिल्ली दि 13 जून कोयना अभयारण्यातील खासगी वन क्षेत्रातील 14 गावांना वगळण्याचा राज्य शासनाच्या शिफारशीला केंद्राने आज बुधवारी मान्यता दिली. केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथील केंद्रीय वन्य जीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
      28 जून 2011 पासून कोयना अभयरण्यातील 14 गावे वगळण्याचा निर्णय प्रलंबित होता.नुकत्याच झालेल्या राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली होती.या बैठकीनंतर केंद्राकडे ही गावे वगळण्याची शिफारस राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  केली होती.423 चौ.की.मी.च्या कोयना अभयारण्यापैकी 99.5 चौ.की.मी खासगी वन्य जागेतील ही गावे वगळण्याचा आज निर्णय झाला.14 पैकी काही गावे ही यापूर्वीच पुनवर्सित झाली आहेत व ती खासगी वन क्षेत्रात येतात.त्यामुळे ही गावे वगळण्यास केंद्राने हीरवा कंदिल दिला.मात्र सोबतच या बैठकीत जे क्षेत्र कमी होईल त्या मोबदल्यात नवीन वन क्षेत्र विकसीत करावे,अशी अट टाकण्यात आली आहे.तथापि,याच बैठकीत राज्य शासनाने नुकतेच 5 अभयारण्य घोषित केले त्याबदृल पर्यावरण मंत्र्यांनी स्वागत केले आहे.
       आजच्या या निर्णयानंतर आता फक्त अंतीम मान्यतेसाठी केंद्रीय सक्षम समितीच्या निर्णयाची अपेक्षा राहणार आहे,अशी माहीती वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी दिली आहे.
.............................................................................................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा