प्रकाशभाई
मोहाडीकर यांच्या निधनाने
सच्चा समाजवादी हरपला : मुख्यमंत्री
मुंबई,
दि. 19 : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सेनानी प्रकाशभाई मोहाडीकर
यांच्या निधनाने एक सच्चा समाजवादी कार्यकर्ता हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दु:ख
व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, “साने गुरुजीं”चे सहकारी असलेल्या प्रकाशभाईंनी त्यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार राज्यभर केला आणि महाराष्ट्रात साने गुरुजींचे विचार रुजविण्याचे
मोलाचे कार्य केले. मुंबईचा समाजवादी चेहरा अशी त्यांची ओळख होती. साने
गुरुजींच्या सहवासात त्यांच्याकडून मिळालेले संस्कार हा प्रकाशभाईंच्या आयुष्यातील
अमूल्य ठेवा होता. हा ठेवा त्यांनी आयुष्यभर जपला आणि इतरांनाही तो दिला. शिक्षक मतदार
संघाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी विधान परिषदेत अनेक प्रश्न तळमळीने मांडले.
त्यांच्या निधनाने गांधीवादी आणि समाजवादी विचारसरणीचा सच्चा पुरस्कर्ता हरपला
आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा