सिंधुदुर्गनगरी, दि.24 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणात जिजाई
महिला सेवा संस्थेचे सिंधुदुर्ग बचत भवन मोलाची कामगिरी बजावेल.हा नाविन्यपूर्ण
सिंधुदुर्ग पॅटर्न संपुर्ण राज्यात राबवावा असे उदगार राज्याचे मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले.
आज जिजाई महिला सेवा संस्था आणि कोकण महिला विकास कंपनी संस्थेच्या
इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री ना.चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत
होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्योग बंदरे रोजगार व स्वयंरोजगार
तथा पालकमंत्री ना.नारायण राणे, महिला बालविकास मंत्री ना. प्रा.वर्षा गायकवाड, खासदर
निलेश राणे,आमदार राजन तेली,आ.सुभाष चव्हाण, जि.प. अध्यक्षा निकिता परब, उपाध्यक्ष
मधुसूदन बांदिवडेकर, माजी आमदार प्रविण भोसले, जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सतिष
सावंत, नगरसेवक रविंद्र फाटक, संस्थेच्या अध्यक्षा निलम राणे स्वाभीमानी
संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात महिलांना आर्थिक्
दृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचतगटांचे मोठे जाळे निर्माण करण्यात आले आहे.
महिलांना स्वयंरोजगारातून आर्थिक दृष्ट्या सक्षम केलं जातंय. सिंधुदुर्ग बचत भवन
मी स्वतः पाहिले. येथील अत्याधुनिक यंत्र सामुग्री, मॉल, फुलपाखरू उद्योग,
प्रशिक्षण कक्ष या अद्यावत सोयींचा लाभ संपूर्ण राज्यासाठी आदर्श असा असेल.बचत
भवन हे अन्य जिल्ह्यातही याप्रमाणे उभे राहिले पाहिजे यासाठी सुक्ष्म उदयोग म्हणून
पॅटर्न निर्माण करावा, त्यासाठीची योजना तयार करावी. निसर्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला
भरभरुन दिलेले आहे परंतु तेवढयाच अडचणीसुध्दा निर्माण केल्या आहेत.
बचत भवन
हे ' कंप्लीट सायकल ' कारण बचतगट एकत्र करणं, त्यांना पतपुरवठा, प्रशिक्षण
मालाचं उत्पादन, पॅकींग आणि बाजारपेठ या सर्व गोष्टी एका हाताखाली आल्या आहेत.
सर्व प्रकारची सेवा 'सिंगल विंडो ' मध्ये निर्माण झाली आहे. नाशवंत मालाला टिकावू
करण्याची गरज कोकणात आहे. इतर कोणत्याही जिल्ह्याशी सिंधुदुर्गशी तूलना होवू
शकत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ना. नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे
दरडोई उत्पन्न एक लाखावर नेण्याचे उद्दिष्ट आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी
माझ्या जिल्ह्यातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून काम मिळणे आवश्यक आहे.
यासाठीच बचत भवन मध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण केल्या. उत्पादित
मालाला हक्काची बाजारपेठ निर्माण करण्यात यामुळे यश आलयं. उत्पादन कौशल्याचं
प्रत्यक्ष मार्गदर्शन या वास्तूत होईल आणि कोकण ब्रॅन्ड केवळ राज्यातच नाही तर
संपूर्ण देशात पोहचविण्यासाठी आपले सहकार्य असावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले
महिला व बालविकास मंत्री ना प्रा.वर्षा गायकवाड म्हणाल्या
की, सिंधुदुर्ग बचत भवन हा राज्याच्या दृष्टीने आदर्श असा पॅटर्न आहे या
धर्तीवर सा-या महाराष्ट्रात असे भवन निर्माण होण्याची गरज आहे. कोकणातील महिला
कष्टाळू आहेत. त्यांच्या हातून तयार होणा-या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ
मिळवून देण्याचे काम यापूढे या भवनात
होणार आहे अशा प्रकारचे उद्योगही जिल्ह्यात सुरु करावेत. असेही त्यानी सुचविले.
प्रारंभी मुख्यमंत्री ना.चव्हाण यांच्या हस्ते फीत
कापून बचत भवनाचे उदघाटन करण्यात आले.मुख्यमंत्री ना. चव्हाण यांनी स्वतः
इमारत फिरून पाहीली. अत्याधुनिक यंत्र सामुग्रीची माहिती डॉ. आनंद तेंडुलकर यांनी
दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलींद कुलकर्णी यांनी
केले. प्रास्ताविक अस्मिता बांदेकर यानी केले
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा