स्कूल बस मालकांच्या मागण्यांविषयी सहानुभूती,
मात्र तातडीने संप मागे न घेतल्यास कारवाई-मुख्यमंत्री
मुंबई, दि. 9 : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस मालकांच्या वाजवी मागण्यांचा शासन सहानुभूतीपूर्वक विचार करेल पण तत्पूर्वी बस मालकांनी पुकारलेला संप बिनशर्त मागे घ्यावा अन्यथा त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बेस्ट सारख्या शहरी परिवहन सेवांमार्फत आवश्यकते प्रमाणे जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय, पालकांचा त्रास व स्कूल बस मालकांवर कारवाई टाळण्यासाठी बस मालकांनी त्यांचा संप त्वरीत मागे घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
आजपासून पुकारलेल्या या संपाची तातडीने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना निर्देश दिले.
बस मालकांच्या सुचनांचा विचार करून सुधारणा
मार्च 2011 मध्ये शासनाने अधिसुचना काढून स्कुल बस धोरण लागू केले. त्यापुर्वी सुमारे दोन वर्ष यासंबंधीत विविध घटकांबरोबर चर्चा व विचार विनीमय करण्यात आला होता. पुणे, नागपूर व मुंबई अशा ठिकाणी कार्यशाळाही घेण्यात आल्या होत्या. बस मालक, शाळा व्यवस्थापन, पालक-शिक्षक संघ, अशासकीय, स्वयंसेवी संस्था अशा संबंधित घटकांशी चर्चा करुन त्यांची मते जाणून घेतल्यानंतरच शासनाने स्कूल बस धोरण जाहीर केले व चालू शैक्षणीक वर्षाच्या सुरुवातीपासून ते लागू केले. अधिसूचना काढण्यापुर्वी हरकती व सुचना मागवून प्राप्त हरकती व सुचनांचा विचार केला होता. राज्यात झालेल्या स्कूल बसेसच्या अनेक अपघातांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसाठी स्कूल बसेसनी करावयाच्या आवश्यक उपाययोजना, सुधारणा विहीत करण्यात आल्या.
अहवालाअगोदर संप योग्य नव्हे
नवीन स्कूल बस वाहतूक धोरण लागू झाल्यानंतर बस मालकांना बसेसमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी पुरेसा वेळ सुध्दा दिला व नोंव्हेबर 2011 मध्ये या धोरणाच्या अमलबजावणीसाठी स्कूल बस तपासणी मोहिम सुरु केली. त्यानंतर स्कूल बस मालक
संघटनेने स्कूल बस धोरणाच्या अमलबजावणीत काही अडचणी आहेत म्हणून काही मुद्दांवर सुट द्यावी किंवा बदल करावेत अशी मागणी डिसेंबर 2011 परिवहन विभागाकडे केली. त्याचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी परिवहन विभागाने डिसेंबर 2011 मध्ये तांत्रीक समिती नेमून बस मालक संघटनेने केलेल्या मागण्या व सुचविलेल्या सुधारणांवर विचार करुन आपला अहवाल शासनाकडे फेब्रुवारी 2012 मध्ये शासनास सादर केला. तांत्रीक समितीचा अहवाल शासनाच्या विचाराधीन असतांनाच स्कूल बस मालक संघटनेने कोणतीही लेखी सुचना न देता अचानक बेमुदत संप सुरु केला आहे.
संघटनेने स्कूल बस धोरणाच्या अमलबजावणीत काही अडचणी आहेत म्हणून काही मुद्दांवर सुट द्यावी किंवा बदल करावेत अशी मागणी डिसेंबर 2011 परिवहन विभागाकडे केली. त्याचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी परिवहन विभागाने डिसेंबर 2011 मध्ये तांत्रीक समिती नेमून बस मालक संघटनेने केलेल्या मागण्या व सुचविलेल्या सुधारणांवर विचार करुन आपला अहवाल शासनाकडे फेब्रुवारी 2012 मध्ये शासनास सादर केला. तांत्रीक समितीचा अहवाल शासनाच्या विचाराधीन असतांनाच स्कूल बस मालक संघटनेने कोणतीही लेखी सुचना न देता अचानक बेमुदत संप सुरु केला आहे.
7 मार्च 2012 रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेस बोलावून स्पष्ट करण्यात आले की, त्यांच्या सर्व मागण्यांचा तांत्रीक समितीने सहानुभूतीपूर्वक विचार केला असून व मुख्य सचिवांनी सुध्दा त्याबाबत बैठक घेतलेली असून त्याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल. तरी बस मालकांनी सद्याच्या परिक्षांच्या दिवसांमध्ये संप करुन विद्यार्थ्यांची व पालकांची गैरसोय करु नये, असे परिवहन विभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
जादा बेस्ट बसेस साठी दूरध्वनी
मुंबईत आवश्यकतेप्रमाणे जादा बेस्ट बसेस सोडण्यासाठी संबंधित शाळेच्या प्राचार्यांनी नजिकच्या बेस्ट उपक्रमाच्या डेपो व्यवस्थापकांकडे संपर्क साधल्यास किंवा बेस्ट उपक्रमाचा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 022-24137937 / 022-24184489 शी संपर्क साधल्यास जादा बसेस सोडण्याची व्यवस्था बेस्ट प्रशासनाने केली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय, पालकांचा त्रास लक्षात घेऊन स्कूल बस मालकांनी / ऑपरेटर्सनी त्यांचा संप त्वरीत मागे घ्यावा, असे आवाहन शासनातर्फे करण्यात येत आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा