वाईट आचार- विचारांना तिलांजली देऊन
चांगल्या गोष्टींचा संकल्प करा
मुख्यमंत्र्याच्या होळीनिमित्त शुभेच्छा
मुंबई, दि. 6 : "वाईट आचार आणि विचारांना तिलांजली देऊन चांगल्या गोष्टींचा संकल्प करा" असे आवाहन करुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, "होळी हा देशभर रंगाचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्व वेगळे आहे. वाईट आचार - विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळी प्रमाणे आगीत जाळून राख करावी, हाच होळी सण साजरा करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करुन चागंल्या गोष्टीचा संकल्प करा. जेणेकरुन आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल.
होळीचा हा सण रंगात न्हाऊन निघतो. या सणानिमित्त बाजारात मिळणाऱ्या रंगात आरोग्यास घातक अशी रसायने असण्याची शक्यता असते. यासाठी रंगपंचमीमध्ये पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगाचा वापर करुन "रंगपंचमीचा आनंद व्दिगुणित करा" असेही मुख्यमंत्र्यानी आपल्या संदेशात म्हटले आहे.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा