मंगळवार, १३ मार्च, २०१२


जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय,
दि. 13 मार्च 2012.

पत्रकार परिषदेचे निमंत्रण
महोदय / महोदया,
        राज्य विधानमंडळाचे अंदाजपत्रकी अधिवेशन गुरुवार, दि. 15 मार्चपासुन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुधवार, दि. 14 मार्च 2012 रोजी सायंकाळी 5 वाजता मा. मुख्यमंत्री महोदयांनी विधीमंडळातील मा. विरोधी पक्षनेते, गटनेते व ज्येष्ठ सदस्यांना चहापान व चर्चेसाठी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे निमंत्रित केले आहे.
        चहापानाच्या कार्यक्रमानंतर मा. मुख्यमंत्री महोदय पत्रकार व प्रसारमाध्यम प्रतिनिधींना संबोधित करतील. आपण कृपया, या पत्रकार परिषदेला उपस्थित रहावे.
        कळावे, ही विनंती.
स्नेहांकित,

(सतीश लळीत)
मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी
पत्रकार परिषद
बुधवार, दि. 14 मार्च 2012
वेळ : सायंकाळी चहापान कार्यक्रमानंतर.
स्थळ : सह्याद्री राज्य अतिथीगृह, मलबार हिल















00000000000000000000000000000000000000000000000000000000000



  

                    राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
                                                                      पहिला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- 400 032.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------                                                                                                                                                                                (प्रसिद्धिपत्रक)                                                              दि. 13 मार्च 2012

                                                                                                                             
                                                                                                                                           भिवंडी-निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी व लातूर        
                     महानगरपालिकेसाठी 15 एप्रिल रोजी मतदान 

मुंबई, दि. 13 : भिवंडी- निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा; तसेच नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या एका रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे जाहीर केला. त्यानुसार रविवार, दि. 15 एप्रिल 2012 रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी 16 एप्रिल 2012 रोजी मतमोजणी होईल. या पाचही महानगरपालिका क्षेत्रात आज (ता. 13) रात्री 12.00 वाजल्यापासून लागू होणारी आचारसंहिता निकाल लागेपर्यंत कायम राहील.
      
येथील सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती सत्यनारायण यांनी हा कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे अपर मुख्य सचिव चाँद गोयल यावेळी उपस्थित होते. श्रीमती सत्यनारायण म्हणाल्या की, चंद्रपूर, लातूर आणि परभणी महानगरपालिकेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. लातूर आणि चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक 24 एप्रिल 2012; तर परभणी महानगरपालिकेची निवडणूक 30 एप्रिल 2012 च्या आत घेणे आवश्यक आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेची मुदत 12 जून 2012 रोजी; तर मालेगाव महानगरपालिकेची मुदत 14 जून 2012 रोजी संपत आहे. नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 च्या सदस्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील 15 एप्रिल 2012 रोजी मतदान होईल. आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जातीचे प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक राहील. नामनिर्देशनपत्राच्या छाननीच्या वेळी ही दोन्ही मूळ प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. 
निवडणूक कार्यक्रमानुसार 20 मार्च ते 27 मार्च 2012 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. सार्वजनिक सुट्टी व रविवारी नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जाणार नाहीत. 28 मार्च 2012 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. छाननीनंतर वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2012 असेल. 31 मार्च 2012 रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप होईल. 2 एप्रिल 2012 रोजी  निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याच दिवशी मतदान केंद्रांची व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होईल. 15 एप्रिल 2012 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. 16 एप्रिल 2012 रोजी मतमोजणी होईल, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.
महानगरपालिकानिहाय मतदार आणि सदस्य संख्येचा तपशील असा:
Ø भिवंडी-निजामपूर: मतदार संख्या-4,59,115,  प्रभाग-45, एकूण जागा-90, महिला राखीव-45, सर्वसाधारण-64 (महिला 32), अनुसूचित जाती-1 (महिला 1), अनुसूचित जमाती-1 (महिला 0), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग- 24 (महिला 12).
Ø मालेगाव: मतदार संख्या-3,67,371, प्रभाग-40, एकूण जागा-80, महिला राखीव-40, सर्वसाधारण-53 (महिला 26), अनुसूचित जाती-3 (महिला 2), अनुसूचित जमाती-2 (महिला 1), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-22 (महिला 11). 
Ø लातूर: मतदार संख्या-2,50,376, प्रभाग-35, एकूण जागा-70, महिला राखीव-35, सर्वसाधारण-39 (महिला 18), अनुसूचित जाती-11 (महिला 6), अनुसूचित जमाती-1 (महिला 1), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-19 (महिला 10). 
Ø चंद्रपूर: मतदार संख्या-2,36,995, प्रभाग-33, एकूण जागा-66, महिला राखीव-33, सर्वसाधारण-31 (महिला 15), अनुसूचित जाती-11 (महिला 6), अनुसूचित जमाती-6 (महिला 3), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग- 18 (महिला 9).
Ø परभणी: मतदार संख्या-2,03,449, प्रभाग-32, एकूण जागा-65, महिला राखीव-33, सर्वसाधारण-40 (महिला 20), अनुसूचित जाती-6 (महिला 3), अनुसूचित जमाती-1 (महिला 1), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग-18 (महिला 9).

दृष्टिक्षेपात महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम
v नामनिर्देशन पत्रे देणे व स्वीकारणे- 20 ते 27 मार्च 2012
v नामनिर्देशन पत्रांची छाननी- 28 मार्च 2012
v उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत- 30 मार्च 2012
v निवडणूक चिन्ह वाटप- 31 मार्च 2012
v निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी- 2 एप्रिल 2012
v मतदान केंद्रांची व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध- 2 एप्रिल 2012
v मतदान दिनांक- 15 एप्रिल 2012 (सकाळी 7.30 ते सायं. 5.30)
v मतमोजणी- 16 एप्रिल 2012

धारणी पंचायत समितीची निवडणूक
अमरावती जिल्ह्यातील धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 एप्रिल 2012 रोजी मतदान होणार आहे. या पंचायत समितीची मुदत 24 जून 2012 रोजी संपत आहे. तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेतील कात्री निवडणूक विभाग, भंडारा जिल्ह्याच्या साकोली पंचायत समितीतील किन्ही निर्वाचक गणाच्या पोटनिवडणुकीसाठी देखील 15 एप्रिल 2012 रोजी मतदान होणार आहे.

0-0-0

२ टिप्पण्या: