महिलांचे मोठ्या प्रमाणात सक्षमीकरणासाठी
प्रयत्न करणे आवश्यक -मुख्यमंत्री
महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ व अमेरिकन ॲल्युमनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समारंभात आपल्या कार्यक्षेत्रात कर्तृत्त्व सिद्ध करणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात कर्मयोगीनी पुरस्काराचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे संचालक रवी बुद्धीराजा, अध्यक्ष विठ्ठल कामत, अमेरिकन ॲल्युमनीचे अध्यक्ष हर्षल शहा तसेच श्रीमती चंद्रा अय्यंगार आदी उपस्थित होते.
जात व हुंडा पद्धत या दोन गोष्टी स्त्री-पुरुषांमध्ये भेदभाव निर्माण करणाऱ्या असून त्याचे समूळ उच्चाटन होणे गरजेचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले. निरक्षरता हा स्त्रियांच्या सक्षमीकरणात येणारा मोठा अडथळा असून साक्षरतेच्या माध्यमातून महिलांना सामाजिक व आर्थिक समानता आणण्यात आपल्याला यश मिळेल.
कर्मयोगिनी पुरस्कार विजेते
सोशल इम्पॅक्ट- प्रथम पुरस्कार- नयन खडपकर (कोकण बझार) ; उपविजेता अर्चना त्र्यंबकराव गायकवाड (आधार तिर्थ आश्रम) ; बिझनेस इम्पॅक्ट - मोनिका गुप्ता (क्राफ्ट व्हीला) ; उपविजेता नीना लेखी (बग्गीत) आणि परी झवेरी ; गव्हर्नन्स इलेक्टेड- प्रथम पुरस्कार शालिनी विखे-पाटील, उपविजेते सरोज शेलगावकर (सरपंच शेलगांव, जि. नांदेड) व नंदाताई ननावरे ; ब्युरोक्रसी- हरविंदर कौर वारिच, उपविजेता लता संभाजी दौंडे व ज्योत्स्ना रासम.
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा