महाराष्ट्र राज्याच्या महाअधिवक्ता पदावर
ॲड. डरायस जहांगिर खंबाटा
मुंबई, दि.28 : महाराष्ट्र राज्याच्या महाअधिवक्ता पदावर ॲड. डरायस जहांगिर खंबाटा (Shri Darius J. Khambata) यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ॲड. रविंद्र मानसिंगराव कदम यांनी महाअधिवक्ता या पदाचा दिलेला राजीनामा स्वीकारून त्यांच्या जागी खंबाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ॲड. डरायस जहांगिर खंबाटा जे ज्येष्ठ विधीतज्ज्ञ आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एल.एल.बी. पूर्ण केल्यानंतर हार्वर्ड लॉ स्कूलमधून 1985 मध्ये एल.एल.एम. ही पदवी संपादित केली आहे. केंद्र शासनाने दिनांक 6 जुलै 2009 पासून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती केली असून सध्या ते या पदावर कार्यरत आहेत. मा. उच्च न्यायालयाने त्यांना दिनांक 23 जुलै 2005 पासून वरिष्ठ वकील (Senior Counsel) म्हणून नामनिर्देशित केले आहे. श्री. खंबाटा यांचा मुंबई उच्च न्यायालयातील एक प्रतिष्ठित वकील म्हणून नावलौकिक आहे.
----0-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा