वाघ वाचवा : वाघ हा निसर्गाच्या अन्नसाखळीतील एक महत्वाचा घटक आहे. सेव्ह अवर टायगर्स ही मोहिम गेली काही वर्षे एनडीटीव्ही वाहिनीतर्फे चालविली जाते. श्री. विक्रम चंद्रा हे प्रसिद्ध मुलाखतकार / अँकर या मोहिमेसाठी अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेऊन वाघ वाचवा अभियानात मोलाची भुमिका बजावित आहेत. महाराष्ट्र सरकारने गेल्या काही वर्षात वाघ संवर्धन क्षेत्रात खुप चांगली कामगिरी केली आहे. नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणुन ओळखले जाऊ लागले आहे. यासंदर्भात श्री. विक्रम चंद्रा यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. लवकरच ती एनडीटीव्ही वाहिनीवरुन प्रसारित होईल. (मुलाखतीनंतर घेतलेल्या छायाचित्रात (डावीकडुन) मी, श्री. चंद्रा, मा. मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव सर्वश्री अभिजित घोरपडे आणि डॉ. एस.पी. सावरगावकर.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा