शनिवार, १७ मार्च, २०१२

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मी (सतीश लळीत), माझे सहकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे, सतीश पाटणकर यांनी त्यांना मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.


मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस ग. दि. कुलथे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  त्यांना मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.


मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि  महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस ग. दि. कुलथे  व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांना यांच्या वाढदिवसानिमित्त मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.


मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त माहिती महासंचालक प्रमोद नलावडे यांनी त्यांना मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.


मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन यांनी त्यांना मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांना सर्व क्षेत्रातून वाढदिवसाच्या शुभेच्छा
        मुंबई दि. 17: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मनमोहन सिंग आणि युपीएच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी दूरध्वनीवरुन तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, राजकीय नेते व कार्यकर्ते यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. आज मुख्यमंत्र्यांनी वयाची 66 वर्ष पूर्ण केली.
 "वर्षा" या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच नागरिकांची रिघ लागली होती.  त्यात विशेषत: सातारा जिल्हयातून आलेल्या कार्यकर्त्यांची संख्याही मोठी होती.  "वर्षा" परिसरात उभारलेल्या शामियानामध्ये मुख्यमंत्री सर्वांच्या अभिनंदनाचा स्वीकार करीत होते.  ज्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नाही अशांनी फॅक्स, ई मेल, दूरध्वनीवरुन शुभेच्छांचा वर्षाव केला. केंद्रीय मंत्री शरद पवार, विलासराव देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योग मंत्री नारायण राणे, सहकार मंत्री  हर्षवर्धन पाटील, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे, सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री वर्षा गायकवाड, नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, उपलोकायुक्त जॉनी जोसेफ, बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ.बी.के.गोयल, बाल सुब्रह्मण्यम, एडीएजी ग्रुपचे अनिल अंबानी, गेलचे चेअरमन बी.के.त्रिपाठी, अंजठा फार्माचे चेअरमन मधुसुदन अग्रवाल, एनपीसीआयएलचे अध्यक्ष श्री. जैन, खासदार प्रिया दत्त, खासदार राजू शेट्टी, खासदार एकनाथ गायकवाड, खासदार निलेश राणे, खासदार जयंत आवळे, विधान परिषदेचे उपाध्यक्ष वसंत डावखरे, आमदार संजयकाका पाटील, आमदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार मोहन रावले, रजनीताई पाटील,आमदार निलेश पारवेकर, आमदार सत्यजीत देशमुख, अमित देशमुख, उल्हास पवार, यशोमती ठाकूर, क्षीतीज ठाकूर, भाऊसाहेब कांबळे, श्री. अग्रवाल, संजय पाटील, विनायक निम्हण, उल्हास जोशी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, माजी आमदार संजय दत्त, शोभा बच्छाव, रजनीताई सातव, महादेव शेलार, चंद्रकांत छाजेड, सचिन सावंत महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, माजी मंत्री वसुधाताई देशमुख, आमदार जयकुमार गोरे, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रमेश कीर, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आनंद (नाना) पाटील, आदीनी वर्षा तसेच विधीमंडळात मुख्यमंत्र्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.                           
      मुख्यमंत्री सचिवालयाकडूनही अभिष्टचिंतन
      सकाळी वर्षा येथून नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारुन मुख्यमंत्री विधानभवन येथे गेले. विधानभवनात राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्याच्या वेळी ते उपस्थित होते. याही ठिकाणी विधीमंडळ सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्‌यांचे मंत्रालयात आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिषकुमार सिंह, डॉ. नितीन करीर तसेच इतर अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री सचिवालयामार्फत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन यांनी मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ दिला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान महत्वाचे असून यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, माहिती महासंचालक प्रमोद नलावडे तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस र.द.कुलथे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिष्टचिंतन केले.

२ टिप्पण्या:

  1. Happy birthday wishes from Mr. Anoop Awasthi, Ex Indian Navy, RTI Activist/Social Worker, E303, Eisha Empire, Handewadi Road, PUne - 411028

    member:
    Indian Ex-Servicemen Movement
    State Convener, National RTI Forum
    member, PUne district legal services authority
    co founder, justice for jawans
    member, advisory committee, Akhil bhartiya janiv sanghatana

    उत्तर द्याहटवा
  2. माझ्या वाढदिवसाबद्दल अतिशय प्रेमाने माझी आठवण ठेवुन शुभेच्छा दिल्याबद्दल मी मनापासुन आभारी आहे. असाच लोभ ठेवावा.

    उत्तर द्याहटवा