(संग्रहातील छायाचित्र / फाईल फोटो) |
छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक
उभारण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 15 : छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात उभारण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असून त्यासाठी निधीची कमतरता जाणवू देणार नाही. केंद्रीय पर्यावरण विभागाने या स्मारकास अद्याप परवानगी नाकारलेली नाही. अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभेत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात ठरलेल्या जागी व्हावे अशा प्रकारचा ठराव सभागृहाने एकमुखाने संमत करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्मारकाला केंद्रीय पर्यावरण विभागाने परवानगी नाकारलेली नाही. स्मारकासाठी परवानगी मिळावी यासाठी राज्यशासन पाठपुरावा करीत आहे. यासंदर्भात विशेष परवानगीसाठी मी तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्र्याशीं देखील चर्चा केली होती. दरम्यानच्या काळात सीआरझेड नियमावलीत बदल झाले. अंतीमत: केंद्र शासनाने या स्मारकाला परवानगी नाकारलेली नाही. स्मारकाच्या परवानगीबाबत सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट घेईन, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, हे स्मारक व्हावे यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी निधीची अडचण भासू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा