शनिवार, १० मार्च, २०१२


जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता हरवला
                       - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

मुंबई, दि. 10 : जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता हरविला, अशा शब्दात माजी खासदार उत्तमराव पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
          उत्तमराव दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारण, समाजकारणात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. विदर्भासह संपुर्ण राज्यात आपल्या मृदू स्वभावामुळे उत्तमराव दादा ओळखले जायचे. राज्याच्या विकासाचीही चांगली जाण असलेला सहकारी हरविला आहे. उत्तमराव दादांसोबत आपण अनेक वर्ष काम केले. राज्याच्या प्रश्नांवर आमची नेहमी चर्चा व्हायची. अनेक वर्ष त्यांनी लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. त्यांचे अचानक जाणे सर्वांसाठीच अतिशय दु:खदायक बाब आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त करतांना म्हटले आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा