रविवार, १८ डिसेंबर, २०११



बेळगाव महानगर पालिकेच्या नगरसेवकांनी घेतली
मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

नागपूर, दि. 18 : बेळगाव  महानगर  पालिका  बरखास्त केल्याबद्दल  कर्नाटक शासनाचा निषेध करुन  बेळगावलगतचा सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावा  असा ठराव  राज्य विधीमंडळात मांडणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना  धन्यवाद देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती व  बेळगाव महानगर पालिकेच्या नगरसेवकांनी रामगिरी येथे आज मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले.
 या शिष्टमंडळात विरोधी पक्षगट नेते नेताजी जाधव, नगरसेवक सर्वश्री पंढरी  परब, किरण सायनाक, किरण  परब, नारायण किटवाडकर, बसवंत  हलगेकर, रतन मासेकर, विक्रांत कंग्राळकर याचेसह सातारा तरुण भारतचे दिपक प्रभावळकर आदी उपस्थित होते. या शिष्टमंडळाने  सीमाभागातील मराठी माणसाच्या आंदोलनाच्या  मागे  शासनाने खंबीरपणे उभे राहावे, अशी विनंतीवजा मागणीही केली.
                      000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा