शनिवार, १७ डिसेंबर, २०११

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी आहे. अजितदादा म्हटले की नेहमी सगळीकडे चर्चा असते, ती त्यांच्या दराऱ्याची आणि कडक स्वभावाची. कदाचित त्यांच्या बोलण्यामुळे, कार्यशैलीमुळे त्यांची ही प्रतिमा बनली असावी. पण मला जेव्हा कधी त्यांच्याशी भेटण्याची किंवा संवाद साधण्याची संधी मिळाली की ही त्यांची प्रतिमा चुकीची असल्याचा प्रत्यय नेहमी येतो. कालही मला त्यांच्या सोज्वळ, आतिथ्यशील आणि मृदु स्वभावाची प्रचिती आली. निमित्त होतं काल रात्री त्यांच्या देवगिरी निवासस्थानी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी आयोजित केलेल्या मेजवानीचं. नागपूर इथं दरवर्षी भरणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी काही मंत्रीमहोदय अशा मेजवान्यांचं आयोजन करतात. कालच्या मेजवानीवेळीही अजितदादा सर्व पाहुण्यांशी अगदी मनमोकळेपणे संवाद साधीत मोठ्या आनंदानं यजमानपण करीत होते. मी आणि माझा सहकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे याला त्यांनी अशी छान पोजही दिली.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा